Eknath Shinde: फडणवीसांनंतर शिंदेंनीही थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी; कुटुंबासोबत केले जेवण अन् केली मोठी घोषणा!

Maharashtra farmers News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जालन्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देत जेवण केले. शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठीही मदतीची घोषणा केली.
Eknath Shinde visits drought-hit farmer
Eknath Shinde visits drought-hit farmerSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Drought News : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जेवण करत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर त्यांनी दुष्कालग्रस्त शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांना धारेवर धरत सज्जड दम भरला. त्याचबरोबर गरीब शेतकऱ्यांच्या मुलींची लग्नं ही शिवसेना लावून देणार असल्याचे सांगितले.

जालना तालुक्यातील भिलपुरी येथील शेतकरी अंबादास तांगडे यांच्या घरी शिंदे यांनी भेट देत त्यांच्यासोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांनी सभेत विविध शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत सरकार या परिस्थितीत तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. "मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, अशावेळी जर कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी जर सक्ती करत असतील तर त्यांचा बंदोबस्त कसा करायचा? हे शिवसेनेला माहित आहे. शेतकऱ्यांना नडाल तर आडव करू", अशा थेट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

दुष्काळामुळे ज्या शेतकरी कुटुंबांतील मुलींची ठरलेली लग्ने आर्थिक अडचणींमुळे करता येत नाहीत, अशा कुटुंबांची यादी तयार करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. संबंधित मुलींची लग्ने शिवसेनेच्या माध्यमातून करून देण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेऊनच आम्ही काम करत आहोत, असे सांगत विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

Eknath Shinde visits drought-hit farmer
Gokul Milk : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाबाबत हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा; म्हणाले 'उद्या महायुतीचा उमेदवार ठरणार'

लाडकी बहीण योजनेवरूनही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर दिले, "लाडक्या बहीणींना जेव्हा आम्ही दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला तेव्हाही विरोधकांनी एवढ्या पैशात काय होते? म्हणत या योजनेला विरोध केला होता. काहीजण कोर्टात गेले होते, पण लाडक्या बहीणींना मिळणाऱ्या दीड हजाराचे महत्त्व माझ्या बहिणांना या दुष्काळात समजले आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही", असा शब्दही शिंदे यांनी उपस्थितांना दिला.

"मराठवाडा, विदर्भासह राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी याभागातून होत होती, त्यानुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अग्रीम म्हणून तातडीची मदत थेट खात्यात जमा झाली आहे. यापुढेही सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदत दिली जाणार आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत बँका, खाजगी फायनान्स कंपन्या सक्तीची वसुली करत असतील, शेतकऱ्यांना नडत असतील तर त्यांना आडवं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही", असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. नांदेडमधील एका कंपनीच्या विरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केल्याची आठवणही शिंदे यांनी करून देत फायनान्स कंपन्यांना दम भरला.

Eknath Shinde visits drought-hit farmer
Maharashtra Politics : 'काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही संपवलं', शिवसेना नेत्याचे गंभीर आरोप, तटकरेंचाही पलटवार; म्हणाले, 'उत्तर देऊ'

भाषणात व्यत्यय, शिंदे संतापले..

मौजपुरी येथे शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर समर्थकांकडून शिंदेंच्या भाषणादरम्यान, घोषणाबाजी केली जात होती. यावर एकनाथ शिंदे चांगलेच भडकले. तु्म्हाला दुष्काळग्रस्तांना मदत हवी आहे की नको, आता आवाज आला तर मी भाषण थांबवून टाकील, अशा शब्दात त्यांनी घोषणा देणाऱ्यांना सुनावले. तसेच व्यासपीठावर बसलेल्या अर्जून खोतकर यांच्याकडे बघत, मुर्ख लोक आहेत, हे असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर खोतकर घोषणाबाजी देणाऱ्या समर्थकांना हात जोडून गप्प राहण्यास सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.