Eknath Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दाैऱ्यावर, 'या' चार खासदारांपैकी दोघांची नाव होणार फायनल?

Eknath Shinde Delhi Visit News : सहा खासदारांनी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. गुरुवारी पुन्हा एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत.
Eknath Shinde appoints woman leader to key post
Eknath Shinde appoints woman leader to key postSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिल्लीत त्यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या वाट्याला दोन केंद्रीय मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एक कॅबिनेट असेल तर एक राज्यमंत्रिपद असणार आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली.

सहा खासदारांनी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. गुरुवारी पुन्हा एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत. दिल्लीमध्ये गुरुवार व शुक्रवार दोन दिवस मुक्काम करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यातच आता केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याने त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आलेल्या खासदारांपैकी नेमकी कोणाला मंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याने यामध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे सातत्याने दिल्लीत येत आहेत. त्यातच येत्या चार दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. यामध्ये बंड करणाऱ्या सहा शिवसेना खासदारापैकी एकाला मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Maharashtra News Live Update : एकनाथ शिंदेंनी बंडखोर खासदारांना तुडवा म्हणणाऱ्या संजय राऊतांना दिलं आव्हान

केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदासाठी खासदार श्रीकांत शिंदे व खासदार श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत आहेत. या पैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेतून आलेल्या खासदार संजय जाधव व ओम राजेनिंबाळकर यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार आहे. या दोघांमध्ये दीड-दीड वर्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुरुवातीला कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Operation Tiger : एकनाथ शिंदेंनी एकाच फटक्यात बदलली समीकरणं : CM फडणवीसांची डोकेदुखी वाढणार?

एकनाथ शिंदे पुन्हा गुरुवारी दिल्ली दाैऱ्यावर जात आहेत. शिंदे दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे नाॅर्थ इस्टच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा पुढील दोन दिवस दिल्लीत मुक्काम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला ही एकनाथ शिंदे हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Opration Tiger : ऑपरेशन टायगर फेल होणार? ओम राजेनिंबाळकरांच्या विधानाने पाच खासदारांची धाकधूक वाढली; दोन दिवसांत...

या बैठकीला राज्यातील तीन प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी काळात होत असलेल्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Opration Tiger : ऑपरेशन टायगर फेल होणार? ओम राजेनिंबाळकरांच्या विधानाने पाच खासदारांची धाकधूक वाढली; दोन दिवसांत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com