Shivsena News : नांदेडच्या 'आभार' दौऱ्यात एकनाथ शिंदेंची 'चाय'डिप्लोमसी! खतगावकरांच्या घरी जाणार

Maharashtra DCM Eknath Shinde embarks on a Nanded tour, engaging in chai diplomacy. He plans to visit former minister Khatgavkar's house as part of his outreach strategy :लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर खतगावकर यांनी सुनेचे राजकीय भवितव्य घडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उद्या (ता.6) नांदेडमध्ये आभार दौऱ्यासाठी येत आहेत. जालना येथील आभार दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता नांदेडमध्ये भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर हे धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे खतगावकर यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जाणार असून ही 'चाय'डिप्लोमसी जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची ठरणार आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस (Congress) सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर भास्कर पाटील खतगांवकर त्यांच्यासोबत गेले होते. सुनबाई मिनल खतगावकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले, परंतु पक्षाने दुसऱ्यांदा प्रताप पाटील चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर खतगावकर यांनी सुनेचे राजकीय भवितव्य घडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली. नायगाव मतदारसंघातून मिनल खतगावकर यांना उमेदवारी मिळवून दिली, पण पुन्हा पदरी निराशाच आली.

Eknath Shinde
Nanded Congress News : विधानसभेला काँग्रेसचा धुव्वा उडताच अशोक चव्हाणांचे मेहुणे खतगावकर पुन्हा नव्या वाटेवर!

दुसरीकडे अशोक चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवले, भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण यांना निवडून आणत त्यांनी पुन्हा जिल्ह्याची सुत्रे आपल्या हाती घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशावेळी चलबिचल झालेल्या भास्कर पाटील खतगावकर यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेशाची तयारी चालवल्याची चर्चा आहे. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्या खतगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन चहापान घेणार असल्याने त्यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जाते.

Eknath Shinde
Eknath Shinde News : एक खासदार, सहा आमदार देणाऱ्या संभाजीनगरकरांचे 'आभार'मानायला एकनाथ शिंदे कधी येणार!

भास्करराव पाटील खतगांवकर हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याने त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. खतगांवकर हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांची जिल्ह्यावर चांगली पकड आहे. दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे जावई आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे असलेले खतगावकर खासदार, तीन वेळा आमदार राहिले आहेत. चाळीस वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास असून त्यातील बराच काळ काँग्रेसमध्ये गेला. त्यानंतर भाजपा, पुन्हा काँग्रेस असे त्यांचे पक्षांतर सुरू होते. आता पुन्हा नव्या पक्षाच्या वाटेवर ते आहेत.

Eknath Shinde
Shivsena News : फडणवीस, अजितदादांच्या पक्षाप्रमाणेच आता शिंदेंचे मंत्रीही 'कॉमन मॅन'साठी मैदानात

खतगांवकर यांचा नांदेड शहरासह, देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड, धर्माबाद, उमरी या भागात चांगला प्रभाव आहे. खतगांवकरांना मानणारा मोठा वर्ग असल्याने खतगांवकर ज्या पक्षात जातील त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खतगांवकरांच्या संपर्काचा फायदा होणार आहे. भास्करराव पाटील खतगांवकर यांच्या घरी उपमुख्यमंत्री शिंदे हे चहापानासाठी येणार असल्याने कदाचित उद्याच त्यांचा सुन मिनल खतगावकर यांच्यासह शिवसेनेत प्रवेश होतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com