Devendra Fadnavis: नाव न घेता 'दादां'ना खूप काही ऐकवलं अन् आरसा पाहा म्हणाले; पुण्यातल्या सभेत फडणवीस विरोधकांवर बरसले

Devendra Fadnavis: पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Published on
Updated on

Devendra Fadnavis: पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपा नेत्यांवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका जाहीर सभेत अजित पवारांचं नाव न घेता त्यांना खूप काही ऐकवलं.

Devendra Fadnavis
Nilesh Chandra: "महाराष्ट्राच्या भूमीवर राहायचं असेल तर मराठीचा सन्मान करावा लागेल"; जैन मुनी निलेशचंद्र आले भानावर

देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांना एक शेर ऐकवला "शरिफ है हम किसीसे लढते नही जमाना जानता है, हम किसीके बाप से डरते नही" या का शायरीच्या माध्यमातून फडणवीसांनी अजित पवारांसह सर्वच विरोधकांना इशारा दिला आहे. फडणवीस पुढे म्हणाले, "निवडणूक हळू हळू गरम होते आहे. ते दादा बोलतायत.. हे दादा बोलतायत... अण्णा बोलतायत.. आता जरा निवडणुकीला रंग भरतोय... मात्र, माझा फोकस विकासावर आज जो पुण्याचा विकास झालेला आहे तो 2015 नंतर आणि 2017 नंतर झालेला आहे. पुण्याच्या मेट्रो संदर्भात चर्चा झाल्या, घोषणा झाल्या मेट्रो काय पुढे जात नव्हती पुण्यानंतर नागपूरच्या मेट्रोची घोषणा झाली कामही सुरू झालं आणि मेट्रोही सुरु झाली.

Devendra Fadnavis
Subhash Deshmukh : नाराज सुभाष देशमुखांनी विमानतळावरच गाठले प्रदेशाध्यक्ष चव्हाणांना; बोलून दाखवली मनातील खंत...

मात्र त्यानंतर आम्ही ठाम निर्णय घेतला आणि कुणाचाही ऐकायचं नाही असं ठरवलं मेट्रोचं काम सुरू केलं एकशे दहा किलोमीटरचा मेट्रोचं नेटवर्क पुण्यामध्ये आपण करत आहोत. त्यातील 33 किलोमीटरचं नेटवर्क आपण पूर्ण केला आहे, 24 किलोमीटरचे अंतिम टप्प्यात आहेत.

Devendra Fadnavis
BJP politics : राजकारणातून खरंच निवृत्ती घेणार का? नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं

पुण्यामध्ये ट्रॅफिक कासवाच्यागतीने पुढे जात आहे. पुण्याचा विचार आपण केला तर देशामध्ये सर्वात कमी रस्ते हे पुण्यामध्ये आहे. एकूण पुण्याचा जर रस्त्याचा हिस्सा बघितला तर केवळ नऊ टक्के आहे. म्हणजे आपण जर इतर कुठल्या शहराचा विचार केला. 18 ते 22 टक्के पर्यंत रस्ते असलेली शहर ही आपल्याकडे आहेत. पण आपल्या देशातलं प्रमुख शहर असलेले पुणे हे कमी रस्ते असणारं शहर आहे.

रस्त्यांचे कशा प्रकारे त्याचं नियोजन केलं आणि कोणी केलं हे मी सांगणार नाही. मला त्याच्यात जायचं नाही मी राजकारणात पडत नाही. पण ज्या कोणी नियोजन केलं असेल पुण्यामध्ये केवळ नऊ टक्के रस्ते आहेत. त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारात असेल तुम्ही काय केलं तर त्यांनी एकदा आरसा पहावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे फडणवीस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com