land scam : ‘कल्याणी ग्रीन्स’ जमीन घोटाळ्यात तत्कालीन दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख उपअधीक्षकांसह 5 जणांना दणका; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

jalna kalyani greens land scam : जालना शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली 11 एकर जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
land scam
land scamSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जालन्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ५ एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न उघड झाला.

  2. न्यायालयाच्या आदेशानुसार भूमी अभिलेख अधिकारी व दुय्यम निबंधकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल.

  3. या प्रकरणामुळे जमीन व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

jalna land scam news : शहरातील मंठा रोडवरील डी-मार्टच्या बाजूला असलेल्या सर्व्हे क्र. ५५४ मधील ११ एकरपैकी ५ एकर (कल्याणी ग्रीन्स) शेतजमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन भूमी अभिलेख अधीक्षक व दुय्यम निबंधकासह ५ जणांवर शुक्रवारी (ता. २४) कदीम जालना ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

तक्रारदार अंकित अभयकुमार आबड (वय ३३, रा. नळगल्ली, जालना) हे कृषी आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे आजोबा दिवंगत कचरूलाल आबड यांचे ते वारस आहेत. दरम्यान, सव्र्व्हे क्र. ५५४ मधील ५ एकर जमिनीवरून आवड कुटुंब आणि त्यांची बहीण संध्या डागा यांच्यात १९८६ पासून दिवाणी न्यायालयात वाद सुरू होता.

संध्या डागा यांनी या जमिनीवर ताबा नसतानाही २०२१ मध्ये आशिष छाजेड यांच्या नावाने एक बनावट जनरल पॉवर ऑफ अटर्नी (मुखत्यारपत्र) तयार केले. या कटात तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक रवींद्र मुथा आणि दुय्यम निबंधक बद्रीनाथ बी. वाडेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. दरम्यान, अंकित आवड यांनी याप्रकरणी नोव्हेंबर २०२२ मध्ये पोलिसांकडे धाव घेतली होती.

land scam
Ashok kharat land scam : 4 कोटींची जमीन 58 लाखांत लाटली; अशोक खरातचा नवा कारनामा उघड

मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायाधीश आर.एम. देवर्षी यांनी २१ एप्रिल रोजी नमूद केले, की हा केवळ दिवाणी वाद नसून बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी नोंदींमध्ये फेरफार करण्याचा फौजदारी गुन्हा आहे. यामध्ये सार्वजनिक सेवकांचा सहभाग असल्याने सखोल पोलिस तपासाची गरज व्यक्त करत न्यायालयाने कलम १५६(३) नुसार कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे मागवण्यात आले होते.

त्यानुसार या प्रकरणाची सूक्ष्म चौकशी कदीम जालना ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी करून सविस्तर अहवाल दिला. त्यावरूनच हे फसवणूक प्रकरण समोर आले. या प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने अॅड. दर्शित आवड यांनी काम पाहिले. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील अॅड. आशिष जाधवर, जालना येथील अॅड. पी.डब्ल्यू. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

यांच्यावर गुन्हा नोंद

कदीम जालना पोलिसांनी संध्या राजेंद्र डागा (वय ६७), राजेंद्र सोभागमल डागा (वय ७३), (दोघे रा. हिंगणघाट, जि. वर्धा), आशिष अशोक छाजेड (वय ३८, जालना), तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक रवींद्र मुथा (वय ४४) आणि दुय्यम निबंधक बद्रीनाथ बी. वाडेकर (वय ५५) या ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे करत आहेत.

land scam
Nashik Land Scam : नाशिकमधील आणखी एक घोटाळा पोहचला विधिमंडळात ; आमदार अनिल परबांचे भाजप नगरसेवकावर आरोप, SIT चौकशीची मागणी..

FAQs :

1. हा जमीन घोटाळा नेमका कुठे झाला?
जालना शहरातील मंठा रोड परिसरातील सर्व्हे क्र. ५५४ मधील जमिनीवर हा प्रकार घडला.

2. किती जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला?
सुमारे ५ एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न झाला.

3. या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाला आहे?
भूमी अभिलेख अधीक्षक, दुय्यम निबंधक आणि इतर ५ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

4. हा गुन्हा कसा उघड झाला?
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला.

5. या प्रकरणाचा पुढील तपास कोण करणार?
स्थानिक पोलिस आणि संबंधित प्रशासन तपास करत असून पुढील कारवाई केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com