
Chhatrapati Sambhajinagar News: भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई व कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा सत्र न्यायालयानं जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. पोलिस निरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांकडून जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 6 डिसेंबर 2014 मध्ये हॉटेल प्राइडमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू होती. या बैठकीस आत जाऊ देण्यास मज्जाव केल्यानं पोलिस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता.
माजी आमदार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा यांना बुधवारी (ता.6) सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे.
जाधव हे 17 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिला आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. चारुशीला पौनिकर यांनी व हर्षवर्धन जाधव यांच्यावतीनं ॲड. प्रकाश जयस्वाल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
कन्नड मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. तसेच हर्षवर्धन जाधव हे संजना जाधव यांचे पूर्वाश्रमीचे पती आहेत. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती युतीच्या पाठिंब्याने संजना जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.
संजना जाधव यांनी 84,492 मते मिळवली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी पती आणि माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव यांचा 18,201 मतांनी पराभव केला. कन्नड मतदारसंघातून पहिल्याच फटक्यात आमदार झालेल्या संजना जाधव यांनी आता मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्येही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवायला सुरूवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.