Kailas Gorantyal News : कैलास गोरंट्याल यांचा 'कही पे निगाहे कही पे निशाना' भाजप प्रवेश की काँग्रेसवर दबाव ?

Former MLA Kailas Gorantyal Mulls Joining BJP After Being Expelled from Congress : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांना हात मोठा राजकीय निर्णय घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली आहे.
Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Jalna Congress News : सभागृहात असो की बाहेर, आपल्या शायराना अंदाजातून सगळ्यांना 'चकवा' देणारे जालन्याचे माजी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा एकदा कोड्यात टाकले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गोरंट्याल आता सुरक्षित ठिकाणाच्या शोधात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर शत्रू असलेले अर्जुन खोतकर सध्या सत्ताधारी पक्षात तर गोरंट्याल हे विरोधी पक्षात आहेत. नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत करण्यात गोरंट्याल यांचा विरोध होता.

मात्र तो धुडकावत खोतकरांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महापालिकेच्या प्रस्तावाला मंजूरी आणलीच. सुरवातीला महापालिका नको, अशी भूमिका घेत रावसाहेब दानवे यांनी कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांच्या भूमिकेला समर्थन दिले होते. परंतु नंतर त्यांनी भूमिका बदलली आणि महापालिका करण्यास संमती दर्शवली. त्यावेळी नाराज झालेल्या कैलास गोरंट्याल यांची नाराजी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दूर झाली आहे. दानवे यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेमध्ये आपल्याला वाटा मिळावा, महापालिकेत अस्तित्व कायम राहावे यासाठी गोरंट्याल आपली शक्ती भाजपाच्या (BJP) पाठीशी उभी करायला तयार आहेत. नेहमी राजकीय भूकंपाची भाषा करणाऱ्या गोरंट्याल याचा हा भूकंप भाजपामध्ये प्रेवश करून होतो का? हे लवकरच स्पष्ट होईल. जालना नगर परिषदेवर गोरंट्याल यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. महापालिका झाल्यानंतर या वर्चस्वाला धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Kailas Gorantyal BJP : '50 खोके-एकदम ओके' घोषणेचा जनकच भाजपच्या वाटेवर?

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांना हात मोठा राजकीय निर्णय घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत करून घेता आला नाही. काँग्रेसचे खासदार पण निधी आणि जिल्ह्यातील कामे ते शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना देतात? यावरूनही गोरंट्याल नाराज असल्याची चर्चा आहे.

Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Raosaheb Danve-Arjun Khotkar : जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत युतीतील दानवे-खोतकरांची प्रतिष्ठा पणाला!

एकीकडे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जुन खोतकर यांच्यावर धुळे येथील शासकीय विश्रामगृहात पीए मार्फत पैसे घेतल्याचा आरोप असताना पक्ष आणि एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही वर्षभरापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कैलास गोरंट्याल यांची पक्षाकडून साधी दखल घेतली जात नाहीये, अशी परिस्थिती. महापालिकेची निवडणुक पाहता ठोस निर्णय घेऊन आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी गोरंट्याल यांनी तडजोड करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Congress Vs Bjp: काँग्रेस भाजपची झोप उडवणार! 'स्थानिक'च्या निवडणुकांसाठी सपकाळांनी टाकला मोठा डाव; तब्बल 280 जणांची टीम अन्...

दानवेंवर नाराजी, पण..

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी कैलास गोरंट्याल यांच्याशी घनिष्ठ मैत्री आहे. परंतु महापालिका करण्याच्या मुद्यावरून त्यांच्यात मध्यंतरीच्या काळात मतभेद झाले होते. दानवे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असताना अनेक जाहीर कार्यक्रमांमधून दानवे-गोरंट्याल एकत्र दिसले होते. अगदी जाहीर कार्यक्रमातून त्यांना तेव्हा भाजप प्रवेशाच्या आॅफरही देण्यात आल्या होत्या. परंतु लोकसभे प्रमाणेच राज्यात विधानसभेला महाविकास आघाडीला यश मिळेल आणि सत्ता आली तर मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती.

Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Arjun Khotkar Trouble : 'धुळे कॅश' प्रकरणात आमदार अर्जुन खोतकरांची अडचण वाढणार; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

महाविकास आघाडीचा विधानसभेला धुव्वा उडाला, जालन्यातून गोरंट्याल देखील पराभूत झाले. माजी झाल्यानंतर पक्षाकडूनही गोरंट्याल यांना फारसे महत्व दिले जात नाही. खासदार कल्याण काळे यांच्याकडूनही दुर्लक्ष होत असल्याने गोरंट्याल यांनी सध्या नाराजीचा सूर आळवला आहे. यातूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. गोरंट्याल यांनी पक्ष सोडला तर जालना जिल्ह्यातून काँग्रेसचे अस्तित्वच संपण्याचा धोका निर्माण झाला आहे. गोरंट्याल यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिल्यानंतर आता खासदार कल्याण काळे त्यांच्या भेटीला जाऊन मनधरणी करणार असल्याचे समजते.

Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Babanrao Lonikar-Raosaheb Danve : मी अन् रावसाहेब दानवेंनी ठरवलं तर जालना महापालिका ताब्यात घेऊ शकतो! लोणीकरांचा दावा..

नगर परिषदेवर कायम वर्चस्व राखलेल्या गोरंट्याल यांना आता महापालिकेत किमान सन्मानाची वागणूक आणि सत्तेतील वाटा मिळावा, अशी अपेक्षा आहे. तर रावसाहेब दानवे यांना पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजपाचा महापौर करत सुत्रं आपल्या हाती ठेवायची आहेत. महायुती असली तरी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फारशी मदत होणार नाही, याचा अंदाज आल्यानेच रावसाहेब दानवे यांनी कैलास गोरंट्याल यांना टाळी दिल्याची चर्चा आहे. दानवे-गोरंट्याल एकत्र आल्यास अर्जुन खोतकर यांचीही अडचण होणार आहे. गोरंट्याल यांना सोबत घेत दानवे यांना खोतकर यांच्यावर अंकुश ठेवायचा आहे, तर गोरंट्याल यांनाही सत्ताधारी पक्षासोबत राहून आपले राजकीय बस्तान कायम ठेवायचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com