Beed Maratha Protest : मराठा आरक्षणासाठीच बीडमधील तरुणाने जीवन संपवले; जबाबात नातेवाइकांनी काय म्हटले ?

Govind Auti Die for Maratha Reservation : शासकीय नोकरी देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही : मराठा क्रांती मोर्चाची भूमिका
Maratha Reservation Protest
Maratha Reservation ProtestSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Political News : मराठा आंदोलनात कायम अग्रेसर असलेल्या तरुणाने आरक्षणासाठीच आत्महत्या केल्याचा जबाब आता नातेवाईकांनी पोलिसांना दिला आहे. तसेच मृत तरुणाच्या नातेवाईकाला शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपयांची मदतीचे लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतल्याने प्रशासनापुढील पेच वाढला आहे. यावर आता काय तोडगा निघणार, याकडे मराठा आंदोकांचे लक्ष आहे. (Latest Political News)

गोविंद गोपीचंद औटे (वय ४२) यांनी नायगाव (ता. पाटोदा) येथे आत्महत्या केली आहे. त्यांनी आंदोलनासाठी आयोजित चक्काजाम आंदोलनाच्या धामधुमीतच गळफास घेतला आहे. औटे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठीच आत्महत्या केल्याचा जबाब नातेवाईकांनी पोलिसांना दिला. त्यामुळे बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News)

Maratha Reservation Protest
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा 'जीआर', समाजाच्या तोंडला पाने पुसण्याचा प्रकार; काय आहे कारण ?

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मागणी आंदोलनात गोविंद औटे कायम अग्रेसर होते. जालन्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बीड जिल्ह्यात सकाळी १० ते १२ या काळात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. नायगाव येथीही आंदोलनाच्या तयारीत गोविंद औटे सहभागी होते. मात्र, इतर आंदोलक आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर गोविंद औटेंनी शेतात जाऊन गळफास घेतला.

Letter to Beed Collector
Letter to Beed CollectorSarkarnama

गोविंद यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच आत्महत्या केल्याचा दावा नातेवाइकांसह मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला. औटेंच्या नातेवाईकास शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपयांची मदतीचे आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. ही मागणी पाटोदाचे उपविभागीय अधिकारी कुदळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याचे पत्र दिले. तसेच, मागणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याची माहिती आहे.

Maratha Reservation Protest
Mangalwedha Water Problem : 'म्हैसाळ'चं पाणी पेटणार? धवलसिंह मोहितेंचा अधिकाऱ्यांना इशारा; म्हणाले...

नातेवाइकांनी दिलेल्या जबाबात मराठा आरक्षणासाठीच गोविंद औटे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे, असे पाटोदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष पाटील यांनी माहिती दिली. दरम्यान, जिल्हाभरात गुरुवारी मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी आता अन्नत्याग आंदोलने सुरु आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com