Hibanama Case News : शिवसेना खासदार भुमरे यांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; हैदराबाद कनेक्शनचा दावा महागात पडणार?

Hibanama Case | Sandipan Bhumre Driver FIR | Hyderabad Link : खासदार भुमरे यांचा वाहनचालक जावेद रसूल शेख तसेच जमिनीचे मूळ मालक मीर मेहमूद अली यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक, विश्वासघात व धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
 Sandipan Bhumre Driver FIR
Sandipan Bhumre Driver FIRSarkarnama
Published on
Updated on

FIR Filed News : गेल्या काही दिवसापासून जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत असलेले शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याच्या 'हिबानामा' प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. शेख याला हिबानामाच्या आधारे छत्रपती संभाजीनगर शहराजवळील नऊ एकर जमीन बक्षीस म्हणून देण्यात आल्याचा प्रकार गेल्या वर्षी जून महिन्यात समोर आला होता. तब्बल दीडशे कोटींच्या या जमिनीच्या बक्षीस पत्रावरून भुमरे यांच्यावरही विरोधकांनी आरोप केले होते.

खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे या दोघांनीही या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही. तसेच आपल्या चालकाने असा कुठलाही हिबानामा व शेतजमीन आपल्याला बक्षीस म्हणून मिळालेली नाही, असा दावा केला होता. परंतु आता या प्रकरणात भुमरे यांच्या चालकाविरूद्ध मुळ शेत जमिनीच्या मालकाच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील दाऊदपुरा परिसरातील नऊ एकर शेत जमिनीच्या हिबानामाचे हे प्रकरण आहे. खासदार भुमरे यांचा वाहनचालक जावेद रसूल शेख तसेच जमिनीचे मूळ मालक मीर मेहमूद अली यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक, विश्वासघात व धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मुजाहिद इकबाल खान यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून काल रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. संबंधित व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

 Sandipan Bhumre Driver FIR
Farm Loan Waiver : कर्जमाफीबाबत बावनकुळेंनी दिली महत्वाची अपडेट; गाडी, बंगला, फार्महाऊस असणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?

काय आहे प्रकरण?

खासदार भुमरेंच्या ड्रायव्हरकडे जवळपास 150 कोटींची जमीन असल्याचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले होते. जावेद रसुल नामक असे भुमरे यांच्या चालकाचे नाव आहे. अनेक वर्षांपासून तो भुमरे यांच्याकडे कामाला आहे.  हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबाच्या वंशजाने जावेद रसुलला ही जमीन भेट स्वरुपात दिली. ही मालमत्ता ‘हिबानामा’ करून दिल्याचे सांगितले जाते.

बक्षीस म्हणून मिळालेल्या या जमिन प्रकरणी परभणी येथील एका वकिलाने तक्रार केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या जमिनीची चौकशी सुरू केली होती. हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबातील वंशजाने जालना रोड येथील उच्चभ्रु वसाहतीतील दाऊदपुरा येथील नऊ एकर जमीन भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसुल यांना भेट म्हणून दिली. यात विरोधकांनी नंतर संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्यावरही आरोप केले होते. परंतु ड्रायव्हरच्या वैयक्तिक आयुष्याशी आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत सगळे आरोप फेटाळले होते.

 Sandipan Bhumre Driver FIR
Ashok Kharat : तू खूप सुंदर आहेस… पण तुझा पती तुला.. अशोक खरात महिलांना कसं ओढायचा जाळ्यात? चौकशीत धक्कादायक माहिती उघड

चालक जावेद रसुल याने तपासाला सहकार्य करणार असल्याचे सांगत हैदराबाद येथील सालारजंग वंशजांशी माझे जवळचे संबंध आहेत. सालारजंग कुटुंबातील अनेक सदस्यांनी हैदराबादच्या पूर्वीच्या निजामाचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. तसेच, मजहर अली आणि इतर सहा जणांनी केलेल्या भेटवस्तूच्या कागदपत्रात असे म्हटले आहे की, त्यांना 30 जानेवारी 2023 पर्यंत चाललेल्या प्रदीर्घ खटल्यानंतर दाऊदपुरा येथील बाग शेरगंज येथील कुळाच्या 12 एकरपैकी नऊ एकर जमिनीचा वाटा मिळाला. तीच जमीन भेट म्हणून जावेद रसुलला दिली गेली आहे.

जावेदचा सालारजंगशी संबध नाही.. 

जावेद रसुल याच्या या दाव्यावर परभणी येथील तक्रारदार वकील मुजाहिद खान म्हणाले, जावेद हा सालारजंग कुळाशी फारसा संबंधित नव्हता. या वस्तूस्थितीमुळे उत्सुकता वाढली. हिबानामा कायदेशिररित्या फक्त रक्ताच्या नातेवाईकांमध्येच वैध आहे. जावेद आणि सालारजंग वंशजांचा काय संबंध हे चौकशीत समोर येईल, असे सागत जावेदचा सालारजंगशी संबध नसल्याचे स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com