High Court News : `त्या` सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदे बहाल..

Marathwada : जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही. म्हणून त्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते.
Bombay High Court Bench Aurangabd, News
Bombay High Court Bench Aurangabd, NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Grampanchayat Member : विहीत मुदतीपुर्वी जातीची वैधता प्रमाणपत्रे दाखल केलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court News) औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी बुधवारी (ता.२१) मंजूर केल्या.

Bombay High Court Bench Aurangabd, News
Hingoli Congress News : नांदेडचा उमेदवार लादण्याच्या हालचाली, चव्हाणांसमोरच घोषणाबाजी..

तसेच त्यांना त्यांची पदे बहाल केली. तर ज्यांच्याकडे जातीची वैधता प्रमाणपत्रे होती, परंतु त्यांनी ती दाखल केली नव्हती, (Aurangabad High Court) असे सरपंच व सदस्यांनी योग्य त्या न्यायाधीकरणाकडे जाण्याची मुभा देऊन याचिका मागे घेतल्या.

सन २०२०-२०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुकीत राखीव पदावर निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही. (Marathwada) म्हणून त्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते.

या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. पैठण तालुक्यातील चांगतपुरी येथील ग्रामपंचायत सदस्या मुक्ता गीते व इतर काही अपात्र ठरवलेले सरपंच व सदस्यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या होत्या.

खंडपीठात एकूण १० याचिकांची एकत्रित सुनावणी झाली होती. अनेक सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करूनही त्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. तसेच १७ जानेवारी २०२३ पर्यंत प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून याचिकाकर्त्यांना अपात्र घोषित केले होते. वरील आदेशामुळे याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.