Hingoli Lok Sabha News: आमच्या नादाला लागू नका, आमचा 'डीएनए' पाटलांचा; ठाकरेंच्या आमदाराचा संतोष बांगरांना इशारा...

Hingoli Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उल्लेख 'डोम्या नाग, असा केला आहे.
Santosh Bangar, Nagesh Patil Ashtikar
Santosh Bangar, Nagesh Patil AshtikarSarkarnama
Published on
Updated on

Hingoli Loksabha News: लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेना लढणार की भाजप? याबाबत चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेत संभाव्य उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. निवडणुकीची धामधूम सुरु असल्यामुळे नेते आपल्या विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी काल एका बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका केली. हिंगोली लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांचा उल्लेख 'डोम्या नाग, असा केला. त्यानंतर अष्टीकर यांनी बांगर यांना 'आमच्या नादाला लागू नका आमचा डीएनए पाटलांचा आहे' असा दम दिला आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) या दोन नेत्यांमधील दमबाजीमुळे जिल्ह्यातील (Hingoli) वातावरण चांगलेच आपले आहे. संतोष बांगर हे (MLA Santosh Bangar) आपल्या कारनाम्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. जिल्ह्यात झालेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमानंतर ठाकरे (Uddhav Thackeray) गटावर टीका करताना बांगर यांनी पातळी सोडून वेडेवाकडे हातवारे केले होते. हे कमी की काय म्हणून काल झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून पुन्हा एकदा त्यांनी आक्षेपार्ह हावभाव करत टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून (Hingoli Lok Sabha Constituency) ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे पाहूनच संतोष बांगर यांनी आष्टीकर यांचा डोम्या नाग असा उल्लेख केला. त्याला आज अष्टीकरांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, माझे नाव नागेश आहे त्यामुळे बांगर यांनी माझ्या नादाला लागू नये. तसा मी खूप संयमी आहे, शांत राहतो कोणाला काही बोलत नाही. परंतु शेवटी एखाद्या व्यक्तीच्या संयमालाही अंत असतो. माझा डीएनए पाटलांचा आहे हे बांगरांनी विसरू नये. मी संयम सोडला तर मात्र बांगर यांना अवघड होईल, असा इशाराच नागेश अष्टीकर यांनी दिला.

Santosh Bangar, Nagesh Patil Ashtikar
Nashik Politics : नाशिकवर भाजपच्या दाव्याने शिंदे गट आक्रमक; पदाधिकाऱ्यांचा थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच इशारा

एकूणच होळी आणि धुलीवंदनाच्या तोंडावर बांगर आणि अष्टीकर यांच्यामध्ये आजपासूनच शिमगा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. होळी नंतर हिंगोलीसह महाराष्ट्रातील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार जाहीर होतील. त्यानंतर या संघर्षाला आणखी धार चढण्याची शक्यता नाकारता येत आहे.

(Edited By jagdish Patil)

Santosh Bangar, Nagesh Patil Ashtikar
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा धक्का; महादेव जानकरांचा ‘यू टर्न’, महायुतीसोबत राहण्याचा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com