Hingoli News : 'मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नका,' असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा युवकांना केल्यानंतरही आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही. हिंगोलीत एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. नवनाथ कल्याणकर असे त्याचे नाव आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'मराठा आरक्षणासाठी मी जीव देत आहे,' अशा आशयाचा मजकूर त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत आहे. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर शिवारात झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. जरांगेंनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरूकेले आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय पुढाऱ्यांना गावात प्रवेश करू दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत राज्यात सुमारे तीन हजार गावात पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. गावागावांत राजकीय नेत्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे. राज्यभरातून पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
काल (बुधवारी) निपाणी (ता. भूम, जि. धाराशिव) येथील एका ३६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. 'एकच मिशन मराठा आरक्षण' अशा आशयाची चिठ्ठी लिहून निपाणी येथील तरुण शेतकरी प्रवीण काकासाहेब घोडके याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. आताप्रमाणे मराठा आरक्षणासाठी सहा जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
आरक्षणासाठी तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, जीवन यात्रा संपवू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी केले आहे. मात्र, आरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.