Shivsena UBT News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा वारेमाप वापर करण्यात आला हा विरोधकांचा आरोप कायम आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील तीन नगरपालिका क्षेत्रात तब्बल शंभर कोटींची उलाढाल झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी केला आहे. पैसे देऊनच मत विकत घेणार असाल, तर निवडणुका घेता कशाला? असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
राज्याच्या निवडणुकीत यापुर्वी पैशाचा इतका वापर कधीच झाला नाही. पैसा फक्त सत्ताधारी पक्षांकडेच असल्याने त्यांच्यातच स्पर्धा निर्माण झाली. एकेका घरात लाख लाख-दोन दोन लाख रुपये वाटले गेले. विरोधी पक्षांकडे तर पैसेच नव्हते. मग ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी समाजकारण करायचेच नाही का? असा उद्विग्न सवालही जाधव यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून लोकशाही पायदळी तुडवली गेली आहे. हे असेच सुरू राहिले तर राजकारणात चांगले लोक येणार नाही, आमच्यासारख्यांनाही निवडणुका लढवता येणार नाही.
भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा वापर केला गेला. शिंदे यांच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याने त्याचा वापर पाथरी व इतर नगरपालिकांच्या निवडणुकीत झाला. पैसे घेऊन मतदान विकत घेतले जाणार असेल, तर जो है पैसे देत आहे, तो निवडून आल्यावर काय ढेकळाचा विकास करणार आहे का? तो खर्च केलेला पैसा वसूल करण्यासाठी बोगस बिल उचलणार, असेही जाधव म्हणाले.
भांबळे, केंद्रेंना मदत केली..
खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी नगरपालिका निवडणुकीत जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांना, तर गंगाखेडमध्ये मधुसूदन केंद्रे यांना मदत केल्याचेही जाहीरपणे सांगितले. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी माझा पक्ष न पाहता मला मदत केली, त्यांच्या उपकाराची फेड करण्यासाठी स्थानिक पातळीवर जर मी काही हातमिळवणी केली तर त्यात काही वावगे नाही. जिंतूरमध्ये मी गेलो नाही, तिथे माझा उमेदवारही नाही, असेही जाधव म्हणाले.
पालकमंत्र्यांनी स्वतःला डाॅन म्हणणे चुकीचे..
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत मी डाॅन आहे, असे विधान केले होते. यावरही संजय जाधव यांनी नाराजी व्यक्त करत त्या माझ्या भगिनी आहेत, त्यांनी स्वतःला डाॅन म्हणून घेणे योग्य नाही. असे कोणी डाॅन म्हटल्याने डाॅन होत नसतं. त्यात महिला आणि मंत्री असलेल्या समाजकारणात काम करणाऱ्या भगिनीने असे बोलू नये. तुमच्या वडीलांचा काळ वेगळा होता, तेव्हा सगंळ सपादून गेले. आता काळ वेगळा आहे, एक चुकीचे विधान सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरते, असे सांगत स्वतःला डाॅन म्हणवून घेणे योग्य नसल्याचे जाधव म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.