Dharashiv Politics : तुळजापूर येथे लव्ह जिहादच्या आरोपावरून एका तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. यात या तरूणाचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तरूणालाही अमानुष मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणात पिडित कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपींना मिळालेला जामीन रद्द करावा, तसेच इतर सर्व आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज धाराशीव येथे माध्यमांशी संवाद साधला.
तुळजापूर लव्ह जिहाद आरोप व अमानुष मारहाण हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, अशी मागणी करतानाच जामीन मिळालेल्या आरोपींच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. सर्व आरोपींना अटक झाली नाही तर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्ह्यात मोर्चा काढू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
तसेच ही हत्या पूर्वनियोजित कट रचून करण्यात आल्याचा आरोप करत, त्यांनी पोलिस यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.या प्रकरणाच्या तपासावर आणि एका आरोपीला मिळालेल्या जामिनावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
'मारहाणीच्या वेळी स्पष्टपणे दिसत असलेल्या संबंधित महाराजाला जामीन कसा मिळाला? पोलिसांचे म्हणणे न मागवताच न्यायाधीशांनी मुख्य आरोपीचा जामीन कशाच्या आधारे मंजूर केला? असा सवाल करत, या जामिनाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले. तरुणाला उचलून शेतात नेऊन काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. तुळजापुरात असे नियोजनबद्ध गुन्हे यापूर्वीही घडत होते आणि पोलिसांना याची कल्पना होती.
आधीच्या मारहाणीच्या घटनांवर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून कारवाई केली असती, तर आज या तरुणाचा जीव वाचला असता. पोलिस गप्प बसल्यानेच आरोपींची हिंमत वाढल्याचा आरोप त्यांनी केला.
तुळजापुरात मागील दीड-दोन वर्षांत अशा प्रकारच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. शहरात विविध माध्यमांतून भरपूर पैसा येत असून, त्याचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होत आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलीसांच्या कारभारावर टीका केली. सर्व आरोपींना अद्याप अटक का झाली नाही? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे असा हल्लाबोलही इम्तियाज जलील यांनी केला.
पोलिसांनी आरोपींच्या अटकेची एक ठराविक तारीख जाहीर करावी; त्या तारखेपर्यंत अटक न झाल्यास मोठा मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, या प्रकरणात कोणाचाही राजकीय दबाव नसून सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले असल्याची माहिती इम्तियाज यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.