Jalna DCC Bank : जालना जिल्हा बँकेत पुन्हा पॉवर शेअरिंग : भाजप आमदाराच्या सुपुत्राकडे अध्यक्षपद, शरद पवारांच्या पक्षाकडे उपाध्यक्ष

Rahul Lonikar Elected Chairman : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अडीच वर्षांपूर्वी बिनविरोध झाली होती. त्यावेळी सुरुवातीचे अडीच वर्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडे चेअरमनपद, तर भाजपकडे व्हाईस चेअरमनपद असा फॉर्म्युला ठरला होता.
Jalana DCC Bank | Rahul Lonikar Elected Chairman
Jalana DCC Bank | Rahul Lonikar Elected ChairmanSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 05 Aug : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीसाठी आज जिल्हा बँकेच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे राहुल लोणीकर यांची अध्यक्षपदी तर निर्मला मरकड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अडीच वर्षांपूर्वी बिनविरोध झाली होती. त्यावेळी सुरुवातीचे अडीच वर्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडे चेअरमनपद, तर भाजपकडे व्हाईस चेअरमनपद असा फॉर्म्युला ठरला होता. अडीच वर्षे पूर्ण झाल्याने जुन्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पायउतार व्हावे लागले. आज नव्याने चेअरमनपद भाजपकडे आले असून राहुल लोणीकर यांची या पदावर वर्णी लागली आहे.

तर व्हाईस चेअरमनपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निर्मला मरकड यांना संधी देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक केंद्रबिंदू असते. परंतु, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती काही वर्षांपूर्वी डबघाईला आली होती. मात्र, मागील दशकापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली असून बँकेला आर्थिक नफा होत असल्याचे चित्र आहे.

Jalana DCC Bank | Rahul Lonikar Elected Chairman
Siddhivinayak Temple : एकनाथ शिंदेंकडून सिद्धीविनायक मंदिराच्या ऑडिटचे आदेश : ठाकरेंच्या काळातील सगळ्या कारभाराची होणार चौकशी

शिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व निर्बंधही हटले असून नाबार्डच्या तपासणीत जिल्हा बँकेला ‘बी प्लस’ वर्गवारी मिळाली आहे. जिल्हा बँकेकडून यंदा शेतकऱ्यांना शंभर कोटींपेक्षा अधिक पिककर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच यंदा बँकेने नोकरभरतीही काढली आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती उंचावत असताना जिल्हा बँकेला राजकीय अड्डा नको, या भूमिकेतून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन अडीच वर्षांपूर्वी 17 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या.

यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पाच, राष्ट्रवादी दोन, भाजप सात, तत्कालीन काँग्रेसचे एक, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असे एकूण 17 संचालक आहेत. सुरुवातीची अडीच वर्षे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे सतीश टोपे चेअरमन, तर भाजपचे भीमराव जाळवे व्हाईस चेअरमन होते.

Jalana DCC Bank | Rahul Lonikar Elected Chairman
Omprakash Rajenimbalkar : शिंदेसोबत गेल्यानंतर ठाकरेंसह घनिष्ठ मित्रासोबतचा फोटो हटविला, पण ओमराजेंना दीड महिन्यानंतरही सापडला नाही साजेसा 'कव्हर फोटो'

अध्यक्षपदावरून लोणीकर- टोपे भिडले होते..

चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीवेळी व्हाईस चेअरमनपद भाजपचे आमदार बबनराव लोणीकर समर्थकांना न मिळाल्याने आमदार राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला झाला होता. शिवाय सायंकाळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे आमदार लोणीकर यांच्या समर्थकांमध्ये लोणीकर यांच्या निवासस्थानी भिडंत झाली होती. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकीय वर्चस्वाचा वाद रस्त्यावर आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com