Jalna Sarpanch Attack: सुनावणी सुरू असतानाच पंचायत समितीत महिला सरपंचावर हल्ला; गळ्यातील गंठण हिसकावून काठीने मारहाण

A woman sarpanch was allegedly assaulted at Mantha Panchayat Samiti: जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समितीत कथित आर्थिक अपहाराच्या आरोपांवरील सुनावणीदरम्यान महिला सरपंचावर मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली. गळ्यातील गंठण हिसकावल्याचा आरोप असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
A woman sarpanch was allegedly assaulted at Mantha Panchayat Samiti
A woman sarpanch was allegedly assaulted at Mantha Panchayat SamitiSarkarnama
Published on
Updated on

Attack On Sarpanch News : जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समितीमधील लाखो रुपयांच्या कथित आरोपांवर सुनावणी सुरू असताना तेथील महिला सरपंचावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. कथित आरोपांवर सुनावणी सुरू असतानाच भुरा पवार यांच्याकडून आयोगातील 3 लाख 69 हजार रुपयांच्या अपहराचा आरोप करत स्थानिक सरपंच मिलन जाधव यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिवीगाळ करू नका, असे म्हणत असतानाच संबंधित व्यक्ती अंगावर धावून गेला आणि त्याने गळ्यातील गंठण हिसकावून घेत काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अचानक झालेल्या या हल्यामुळे पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलीसांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. पुढील कारवाई मंठा पोलीस करत आहेत.

पावणे तीन लाखांच्या कथित अपहाराच्या आरोपांवर बुधवारी मंठा पंचायत समितीमध्ये सुनावणी होती. यासाठी सरपंच मिलन जाधव, त्यांचे पती, ग्रामसेवक व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी भुरा पवार हा तक्रारदार देखील उपस्थित होता. या आरोपावरून त्याने महिला सरंपचाला शिवीगाळ सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्याने सर्वांसमक्ष सरपंचाच्या अंगावर धावून जात मारहाण केली.

A woman sarpanch was allegedly assaulted at Mantha Panchayat Samiti
Narendra Pawar: भाजपच्या माजी आमदाराचा जामीन फेटाळला; 6 पथके घेताहेत नरेंद्र पवारांचा शोध

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार केल्याची तक्रार करून वारंवार पैशासाठी दबाव आणला जात होता. तसेच पैसे दिले नाही तर चौकशी लावून ग्रामपंचायतीची विकासकामे होऊ देणार नाही, अशी धमकी दिली जात होती, असा आरोप सरपंच मिलन जाधव यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

A woman sarpanch was allegedly assaulted at Mantha Panchayat Samiti
Maharashtra Political Live Update : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा, पोलिस अलर्ट मोडवर

पंचायत समितीमध्ये सुनावणी दरम्यान संशयित भुरा पवार याच्याकडून मारहाण आणि गळ्यातील गंठण हिसकावल्याची तक्रार महिला सरपंचाने मंठा पोलिसात केली आहे. यामध्ये भुरा पवार, भाऊसाहेब राठोड आणि सिताराम यांची नावे आहेत. मंठा तालुक्यातील खोराड सांवगी ग्रामपंचायतीशी संबंधित हे प्रकरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com