Jyoti Mete News : ज्योती मेटेंची लोकसभा निवडणुकीतून माघार; म्हणाल्या, समाजासाठी कुंकू गमावले...

Beed Loksabha :दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे शिवसंग्रामची धुरा सांभाळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव चर्चेत होते.
Jyoti Mete News : ज्योती मेटेंची लोकसभा निवडणुकीतून माघार; म्हणाल्या, समाजासाठी कुंकू गमावले...

Beed Political News : बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डाॅ. ज्योती इच्छुक असल्याची चर्चा होती. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांनी अधिक जोर धरला. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात शासकीय नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्या राज्याच्या सहकार विभागाच्या अपर सहनिबंधक पदावर कार्यरत होत्या. बीड लोकसभा निवडणूक त्या लढतील अशी शक्यता वर्तवली जात असताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले.

Jyoti Mete News : ज्योती मेटेंची लोकसभा निवडणुकीतून माघार; म्हणाल्या, समाजासाठी कुंकू गमावले...
Manoj Jarange News: 'माझ्या वाटेला जाऊ नका'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंच्या टीकेवर पलटवार

'दबाव किंवा प्रलोभनाला आपण बळी पडणार नाही. आपण दिवंगत विनायक (Vinayak Mete) मेटेंच्या पत्नी असल्याने लोकभावनेशी तडजोड नाही. सर्व बाबींची चाचपणी केली. जनतेच्या मनातील भावना आजही कायम आहे. समाजासाठी आपण कुंकू गमावले. त्यामुळे आता गमावण्यासाठी काहीच नाही. लोकभावनेचा आदर करूनच आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही,' असे शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे ( Jyoti Mete) यांनी जाहीर केले.

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे शिवसंग्रामची धुरा सांभाळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. दिवंगत मेटे यांनी विविध समाज घटकांसाठी केलेल्या कामांची सहानुभूती, क्लीन चेहरा व महिला या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जात होत्या. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविणारच, असे जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली. त्यानंतरही त्यांचे जिल्ह्यात दौरे सुरू होते. त्यामुळे डॉ. ज्योती मेटे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.

आज (शनिवारी) डाॅ. ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. जनतेतून उमेदवारीबाबत उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. जनतेच्या स्वाभिमानासाठी लढावे, अशी मागणी होती. त्यासाठीच आपण सेवानिवृत्ती घेतल्याचे डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले. उमेदवारी न मिळाल्यानंतर काही पर्याय खुले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले लोकभावनेचा आदर करून मतांची विभागणी टाळण्यासाठी निवडणूक लढविणार नसल्याचे डॉ. ज्योती मेटे यांनी जाहीर केले.

व्यापक समाजहित लक्षात घेता हा निर्णय घेत असल्याचे त्या म्हणाल्या. आता निवडणुकीत कोणाच्या बाजूने ताकद उभी करणार, याबाबत प्रदेश पातळीवर संघटना निर्णय घेणार असल्याचे डॉ. ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले. या वेळी भारतीय संग्राम पक्षाचे प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे नारायण काशीद, मराठा क्रांती मोर्चाचे मंगेश पोकळे, बी. बी. जाधव, डॉ. प्रमोद शिंदे, अनिल घुमरे आदी उपस्थित होते.

R

Jyoti Mete News : ज्योती मेटेंची लोकसभा निवडणुकीतून माघार; म्हणाल्या, समाजासाठी कुंकू गमावले...
Ajit Pawar Vs Sharad Pawar : बारामतीत सर्व साहेबांनीच केलं, तर मी काहीच केलं नाही का? अजितदादांनी पुन्हा तोफ डागली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com