Kailas Gorantyal Join BJP : कैलास गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

Kailas Gorantyal to Join BJP on 31st, Message Received from Mumbai : भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे आणि अतुल सावे यांनी फोन करून गुरूवारी (ता.31) पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित केल्याचे आपल्याला सांगितले आहे.
Kailas Gorantyal Jalna News
Kailas Gorantyal Jalna NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalan Political News : काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यासोबत माझा प्रवेश नको, अशी भूमिका घेतलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गुरुवारी (ता.31) रोजी मुंबईत प्रदेश कार्यालयात गोरंट्याल हे आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. तर आज सुरेश वरपूडकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने काँग्रेसचे मराठवाड्यातील दोन मोठे मासे गळाला लावले आहेत. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर आणि जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांचा भाजाप प्रवेश निश्चित झाला आहे. या दोन नेत्यांच्या पक्षात येण्याने भाजपाची ताकद वाढणार आहे, तर काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे.

दरम्यान, कैलास गोरंट्याल यांनी आपला पक्षप्रवेश सुरेश वरपूडकर यांच्यासोबत नको, अशी इच्छा भाजपा नेत्यांसमोर व्यक्त केली होती. त्यानूसार आता 31 तारखेला गोरंट्याल व त्यांच्या समर्थकांचा स्वतंत्र प्रवेश सोहळा होणार आहे. (Jalna) गोरंट्याल यांनी स्वत:च ही माहिती माध्यमांना दिली आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकद वापरून स्वबळावर लढण्यासंदर्भात आपण भाजपा नेत्यांकडे भूमिका मांडणार आहोत, याचा पुनरुच्चार गोरंट्याल यांनी केला.

Kailas Gorantyal Jalna News
Kailas Gorantyal-Suresh Warpudkar News : वरपुडकर गेले, गोरंट्याल निघाले; परभणी, जालन्यातली काँग्रेस जवळपास संपुष्टात!

भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे आणि अतुल सावे यांनी फोन करून गुरूवारी (ता.31) पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित केल्याचे आपल्याला सांगितले आहे. भाजप प्रदेश पक्ष कार्यालयात हा प्रवेश होणार असून काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा देखील यावेळी भाजपात प्रवेश होणार आहे.

Kailas Gorantyal Jalna News
Jalna Municipal Corporation : गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामागे मोठ्ठा प्लॅन... खोतकरांंना महापालिकेत घाम फुटणार!

गोरंट्याल यांचा राजकीय प्रवास

कैलास गोरंट्याल हे 35 वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. 1999, 2009 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते जालना विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 1999 ते 2024 अशा सलग सहा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती.

Kailas Gorantyal Jalna News
Suresh Warpudkar News : मेघना बोर्डीकर-सुरेश वरपूडकरांच्या एकत्रित ताकदीने परभणीत भाजप भक्कम!

सध्या ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मागील दहा वर्षांपासून तत्कालीन जालना नगरपालिकेवर गोरंट्याल यांची एकहाती सत्ता राहिली. कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल पाच वर्ष नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com