Kalyan Kale : केंद्र अन् राज्यातील सरकार जाऊन राहुल गांधी पंतप्रधान होणार; काँग्रेस खासदार कल्याण काळे यांचा दावा

Chhatrapati Sambhajinagar news: छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढला. खासदार कल्याण काळे यांनी केंद्र आणि राज्यातील सरकार बदलण्याचा दावा करत राहुल गांधी पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.
Kalyan Kale
Kalyan KaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada drought News: राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार सत्तेतून जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी संविधानाला मानणारे सरकार सत्तेवर येईल आणि आमचे नेते राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास खासदार कल्याण काळे यांनी या निमित्ताने व्यक्त केला. या देशातील नागरिक, विद्यार्थी, महिला असा सर्व घटक त्रस्त आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा पेपर दररोज फुटतो आहे, राज्यात आणि मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना सरकारने मात्र जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आणि आमचे नेते राहुल गांधी नेटाने लढा देत आहेत. असे काळे यांनी सांगितले

केंद्रातील मोदी- शहांचे सरकार तर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जावून काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येईल. निश्चितच राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही कल्याण काळे यांनी माध्यमांशी बोलताना केला. गेल्या तीन महिन्यापासून आम्ही सरकारशी भांडतोय. पावसाळ्यात 70 दिवसापासून पावसाचा खंड आहे, मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. मात्र सरकार त्यांना मदत करायला तयार नाही.

Kalyan Kale
Sushma Andhare : भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील टोलचा 'झोल' ठाकरेंच्या रणरागिणीने आणला चव्हाट्यावर

दुष्काळ जाहीर केला, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी टाकणार? असा सवाल करतानाच हा मोर्चा शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी असल्याचे कल्याण काळे म्हणाले. या सरकारवर प्रत्येक घटक नाराज आहे शेतकरी संकटात आहे, विद्यार्थी हाताला काम नाही म्हणून आणि सातत्याने पेपरफुटी सारखे प्रकार घडत आहेत यातून निराशेच्या गर्तेत जात आहे. देशातील जनतेच्या आता लक्षात आले आहे की सरकारची वाटचाल ही हुकूमशाहीकडे सुरू आहे. या विरोधात राहुल गांधी नेटाने लढा देत आहेत. यामध्ये निश्चितच राहुल गांधी यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही कल्याण काळे यांनी व्यक्त केला.

Kalyan Kale
Abhijeet Dipke: "मोदींनी हिंमत दाखवून अधिकृत आणीबाणी जाहीर करावी"; अभिजीत दिपके पंतप्रधानांवर इतके का भडकले?

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ, शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने टँकर सुरू, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था अशा विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात आणि खासदार कल्याण काळे मोर्चात सहभागी झाले होते. पैठण गेट येथून सुरू झालेला मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com