Sushma Andhare : भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील टोलचा 'झोल' ठाकरेंच्या रणरागिणीने आणला चव्हाट्यावर

Beed News: सुषमा अंधारे यांनी बीड जिल्ह्यातील केजजवळील टोल नाक्यावर कथित अनियमिततेचा आरोप केला. टोल वसुलीच्या कागदपत्रांची तपासणी करून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आमदार सुरेश धस यांच्याकडे केली.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायरब्रँड उपनेता म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांचा एक फेसबुक व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. केज वरून पुण्याकडे जाताना मस्साजोगपासून काही अंतरावरील राष्ट्रीय मार्गावरच्या एका टोलचा झोल अंधारे यांनी उघडकीस आणला.

सात लेन असलेला हा टोल प्लाझा अक्षरशः बेकायदेशीर वसुली करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याचा दावा अंधारे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. पुण्याकडे जाताना केजजवळील या टोल नाक्यावर सुषमा अंधारे यांनी टोल भरण्यासाठी आपली गाडी थांबवली. मात्र यावेळी आजूबाजूच्या सर्व लेन बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

एकाच लेनमधील वाहनांकडून टोल वसुली केली जात आहे, तर काही वाहने ही टोल न घेताच सोडून दिली जात होती. या प्रकारामुळे सुषमा अंधारे यांचा संशय बळावला. आणि त्यांनी टोल वसुलीसाठी तैनात असलेल्या पाच ते सहा तरुणांच्या टोळक्यांना याबाबत जाब विचारला. मला टोल भरायचा आहे, परंतु त्याआधी या टोलच्या वसुली संदर्भातील काही कागदपत्र तुमच्याकडे असतील तर ती मला दाखवा, असे त्या संबंधित कर्मचाऱ्यांना म्हणाल्या. यावर त्यांनी आमच्या मॅनेजरशी बोला म्हणत तिथून धूम ठोकली.

टेंडर भरल्याचा कागद दाखवला..

टोल वसुली करणारेच पळून गेले हे पाहून सुषमा अंधारे यांनी मूळ मध्य प्रदेशातील असलेली एक व्यक्ती व्यवस्थापक म्हणून सुषमा अंधारे यांच्यासमोर आली. तेव्हा अंधारे यांनी त्याच्याकडे टोल वसुली परवाना असलेल्या कागद मला दाखवा, असा आग्रह धरला. यावर त्याने संबंधित टोल नाक्यावर वसुलीचे कंत्राट मिळावे यासाठी भरलेल्या अर्जाची प्रत सुषमा अंधारे यांच्या हाती टेकवली. हे पाहून अंधारे यांना धक्का बसला आणि इथे सुरू असलेली टोल वसुली ही बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

Sushma Andhare
BJP politics : विरोधक एकवटलेले असतानाच भाजपने दिला दणका; इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाचे तीन आमदार फोडले...

यानंतर त्यांनी वैद्यकीनी गावाजवळील या टोल नाक्याचा झोल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समोर आणला. संबंधित भागातील पोलीस स्टेशनला फोन करून इथे अवैधरीत्या टोल वसुली सुरू असल्याचे त्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांना कळवले. यावर असा काही प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या गावीच नव्हते हे अंधारे यांच्या लक्षात आले. काही मिनिटात घटनास्थळी येतो असे सांगून पोलीस दोन तास तिकडे फिरकलेच नाही.

या दरम्यान सुषमा अंधारे यांनी टोल नाक्यावरील प्रत्येक लेनच्या केबिनची दुरावस्था, तिथे टोल वसुलीसाठी कुठल्याच प्रकारची नोंद, संगणक किंवा कर्मचारी नसल्याचे दाखवत लोकांकडून सर्रास टोलच्या नावाखाली वसुली सुरू असल्याचे उघडकीस आणले. पोलीस येत नाही म्हटल्यावर सुषमा अंधारे यांनी संबंधित तहसीलदारांना फोन करून हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडूनही कुठला प्रतिसाद मिळाला नसल्याचे अंधारे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले.

एका राष्ट्रीय महामार्गावर गेल्या कित्येक महिने वर्षापासून हा टोल वसुलीचा धंदा सुरू आहे, मात्र त्याकडे ना पोलिसांचे लक्ष गेले ना जिल्हा प्रशासनाचे? याबद्दल अंधारे यांनी आश्चर्य व्यक्त केले. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात हा टोल नाका येतो, त्यांनी तरी किमान याची माहिती घेऊन सत्य समोर आणावे, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले.

Sushma Andhare
Tushar Rathod : आमदार तुषार राठोडांना दिल्लीत पाठवण्याची खेळी? अशोक चव्हाण, चिखलीकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

अंधारे यांनी सुरेश धस यांना टोल संदर्भातील कागदपत्रे आणि सत्यता तपासून ही माहिती चुकीची असेल तर मला निदर्शनास आणून द्या, माझी ही अपेक्षा आहे की माझी माहिती चुकीची ठरावी, माझ्या बीड जिल्ह्यात असा गैरप्रकार घडत नाही हे स्पष्ट झाले तर मलाही त्याचा आनंदच होईल, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी या टोलच्या बेकायदेशीर वसुलीची चौकशी करावी अशी मागणी धस यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com