Kalyan Kale : मेल करूनही परराष्ट्र मंत्र्यालय, नागरी उड्डाण मंत्र्यांचा प्रतिसाद नाही; दुबईत अडकलेल्या खासदारांनी सांगितली वस्तुस्थिती

Dubai flight Cancellation News : अमेरिका-इराण तणावामुळे दुबईतील विमान उड्डाणे रद्द झाल्याने खासदार कल्याण काळे अडकले. मदतीसाठी केलेल्या मेलला परराष्ट्र मंत्रालयाचा प्रतिसाद न मिळाल्याची नाराजी त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
Congress MP Kalyan Kale
Congress MP Kalyan Kale addressing media after returning from Dubai, alleging no response from the External Affairs Ministry when Indian tourists were stranded due to sudden flight cancellations.Sarkaranama
Published on
Updated on

Jalna Politics News : आखाती युद्धामुळे विमानांची उड्डाणे अचानक रद्द झाली. मी कुटुंबिय आणि मित्रांसह दुबईत अडकलो. अनेक सामान्य नागरीक, भारतीय पर्यटकही आमच्यासोबत होते. मदतीसाठी मी परराष्ट्र मंत्री व संबंधित विभागांना मदतीसाठी मेलही केला.

पण माझ्या मेलला कुठलेही उत्तर किंवा प्रतिसाद संबंधित विभागाकडून मिळाला नाही. एका खासदाराची ही अवस्था असेल तर मग सर्वसामान्यांचे काय? असा सवाल करत काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

ईस्राइल, अमेरिका- इराण दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासंदर्भात परराष्ट्र मंत्री आणि हवाई वाहतूक मंत्र्यांना मी दुबईत असताना मेल केला होता. मात्र परराष्ट्र मंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संकटकाळी देशातील नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलासा देणे अपेक्षित होते, मात्र तसे काही झाले नाही, अशी खंतकाळे यांनी व्यक्त केली.

Congress MP Kalyan Kale
Congress News : काँग्रेसचा गटनेताच फुटला!जालना महापालिकेत नाचक्की; एक स्वीकृत सदस्य करण्याची संधीही हुकली!

दुबई येथून परतल्यानंतर शुक्रवारी कल्याण काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 27 फेब्रुवारी रोजी मुंबई येथून कुटुंबासह दुबईला गेलो होतो. 28 फेब्रुवारी रोजी तेथे पोहोचल्यानंतर अमेरिका-इराण युद्धाची धग दुबईत जाणवत होती. त्यामुळे आम्ही तेथे अडकून पडलो. तेथे मराठवाड्यातील 200 ते 250 नागरिकांची भेट झाली. त्या नागरिकांना दिलासा देत भारताच्या दूतावास कार्यालयाशी संपर्क साधला.

Congress MP Kalyan Kale
Parbhani News : निर्ढावलेले कंत्राटदार, निधीचा खडखडाट; परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे तीनतेरा

तसेच ज्या भारतीय नागरिकांचे हॉटेल बुकिंग व विमान तिकिटे रद्द झाली होती, त्यांची माहिती दूतावास कार्यालयास दिली. शिवाय परराष्ट्र मंत्री आणि नागरी उड्डाण मंत्र्यांना मेल केला. मात्र त्या मेलला कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप देशात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय किती गंभीर होते हे स्पष्ट होते, अशी नाराजीही काळे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com