Latur Lok Sabha Constituency : 'लातूरची बोगी थेट मोदींच्या इंजिनला...'

Lok Sabha Election 2024 : या जिल्ह्याला, लातूरला पाणीदार केल्याशिवाय मी आणि संभाजी पाटील निलंगेकर स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. केंद्रीय विद्यापीठाची मागणी घेऊन आपण मोदींकडे जाऊ, अशी ग्वाही देतांनाच शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Latur, 30 April : इंडिआ आघाडीच्या इंजिनमध्ये सर्वसामान्यांना जागा नाही. उद्धव ठाकरेंच्या इंजिनात आदित्य ठाकरे, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे आणि राहुल गांधी यांच्या इंजिनात फक्त सोनिया आणि प्रियंका गांधी यांना जागा आहे. तुमच्यासाठी या तीनही नेत्यांच्या इंजिनात जागा नाही. तेव्हा तुम्ही मोदीजींच्या इंजिनात बसा, लातूरची बोगी थेट मोदीसाहेंबाच्या इंजिनाला जोडली जाणार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडी आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली.

लातूर मतदारसंघाचे (Latur Lok Sabha Constituency ) महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्यासाठी आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जन आशीर्वाद सभेत फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. सभेला जमलेली गर्दी पाहून मोदींच्या आतापर्यंत झालेल्या सभांचा रेकाॅर्ड मोडणारी ही सभा असल्याचे सांगत लातूरकर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील, असा मला विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Modi's Malshiras Sabha : माळशिरसच्या सभेत मोदींचा पवारांवर निशाणा...

मोदींचे मी आभार मानतो, त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरी दिली. आता याच रेल्वे कोच फॅक्टरीत वंदे भारत ट्रेनचे डब्बे तयार होणार आहेत. देशातील कुठल्याही वंदे भारत ट्रेनला इथल्या फॅक्टरीत तयार झालेले डब्बे असती, याचा लातूरकरांना अभिमान वाटेल.

या जिल्ह्याला, लातूरला पाणीदार केल्याशिवाय मी आणि संभाजी पाटील निलंगेकर स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. केंद्रीय विद्यापीठाची मागणी घेऊन आपण मोदींकडे जाऊ, अशी ग्वाही देतांनाच शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Sangola Politics : शहाजीबापू मोहिते पाटलांविरोधात आक्रमक का? विधानसभेच्या राजकीय गणितांची भीती की आणखी काय...?

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान महायुती सरकार भरून काढेल, अशी हमी त्यांनी दिली. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी संगीत खुर्ची सुरू आहे. ते पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकलेले नाहीत. आता भोंगा वाजवून तो थांबल्यावर जो खुर्चीवर बसेल, त्याला ते पंतप्रधान करणार आहेत का? असा टोलाही फडणवीसांनी इंडिया आघाडीला लगावला.

Edited By : Vijay Dudhale

Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024 : सोलापूर अन् माढा मतदारसंघांत पक्ष बदलाची प्रक्रिया थांबता थांबेना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com