

Nagpur Election: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपला मत म्हणजे विकासाला मत अशी प्रचाराची टॅगलाईन सध्या जोरात सुरू आहे. त्याचा आज काँग्रसेच्यावतीने चांगलाच समाचार घेण्यात आला. दोन उड्डाणपूल बांधले आणि एक फाउंटन लावले म्हणजे संपूर्ण शहराचा विकास झाला आणि नागपूरकरांच्या समस्या सुटल्या का असा सवाल करून काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी टार्गेट केले.
काँग्रेसने यावेळी ११० नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. याकरिता कुठल्या भांडणाशिवाय तिकीट वाटप केले. बंडखोर आणि नाराजांना बसवण्यात काँग्रेसला शंभर टक्के यश आले आहे. यावेळी भाजपच्या आधीच काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे विमोचन करण्यात आले. यावेळी विकास ठाकरे म्हणाले, महापालिकेचे कार्यक्षेत्र, अधिकार आणि लोकांच्या गरजा व अपेक्षा काय आहे यावर आमचा भर आहे. दोन चार उड्डाण पूल बांधले, फाउंटन निर्माण केले म्हणजे विकास होत नाही लोकांच्या समस्या सुटत नाही. महापालिकेचा संबंध लोकांच्या दैनंदिन गरजांशी असतो. लोकांना नियमित पाणी, चांगले रस्ते हवे असतात. गटारे तुंबली जाऊ नये आणि शहर स्वच्छ असावे एवढ्या माफक अपेक्षा त्यांच्या असतात.
भाजपने शहरभर रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. रस्ते उंच केले. त्यातून एक नवीन समस्या निर्माण केली. लोकांच्या घरांमध्ये पावसाळ्याचे पाणी शिरू लागले. अर्धे नागपूर पावसाळ्यात पाण्याखाली गेले होते. प्रत्येकच वैयक्तिक मोठे नुकसान या रस्त्यांच्या माध्यमातून भाजपने केले आहे. फुटाळा तलावच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. विदेशातून फाउंटन आणणण्यात आले, ते एकाच दिवसात बंद पडले. त्यासाठी कोट्यवधींचा चुराडा झाला. खाजगी कंत्राटदारांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन केले जाते. मात्र पैसे दिल्याशिवाय नागरिकांच्या घरातून कचरा उचलला जात नाही असा आरोपही ठाकरे यांनी केला.
भाजप १९ वर्षांपासून महापालिकेत सत्तेत आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजप जाहीरनामा प्रकाशित करते. मोठमोठी आश्वासने देते. १९ वर्ष सत्तेत असल्याने भाजपला आता निवडणुकीत भाजपला जाहीरनामा प्रकाशित करण्याचीच गरजच राहिली नाही, इतका विकास भाजपने केला असल्याचा टोलाही यावेळी ठाकरे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.