Lok Sabha Election 2024: विरोधकांची लंका खाक करून तुतारीची पिपाणी होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi: "26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही आतंकवाद्यांची नव्हती असं काँग्रेसवाले बोलू लागले आहेत. या देशात राहता आणि पाकिस्तानचे गोडवे गाता? यांना देशद्रोहाच्या कलमामध्ये तुरुंगात टाकले पाहिजे."
Eknath shinde
Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील वातावरण तापत असून चार तारखेला महाराष्ट्राचा पारा 45 पार होईल आणि देशाचा 400 पार होईल. शिवाय विरोधकांची लंका खाक करून तुतारीची पिपाणी होईल, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

पंतप्रधान मोदींची (Narendra Modi) गॅरंटी चालतेच, मात्र यंदा लोकांनीच देशात मोदींचे सरकार आणण्याची गॅरंटी घेतली असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामांचं तोंडभरून कौतुक केलं. शिवाय महायुतीने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान मोदींनी जगात देशाचा लौकिक वाढविला, आपले जीवन देशसेवेला अर्पण केले. इंडिया आघाडीवाले आता पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही आतंकवाद्यांची नव्हती असं काँग्रेसवाले (Congress) बोलू लागले आहेत. या देशात राहता आणि पाकिस्तानचे गोडवे गाता? यांना देश द्रोहाच्या कलमामध्ये तुरुंगात टाकले पाहिजे असं शिंदे म्हणाले.

शिवाय मोदींना विरोध करायचा असेल तर करा, परंतु त्यासाठी कुठल्याही पातळीवर जाऊ नका, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना सुनावलं. तसेच, 'बुडाला जळतय आणि डोंगरावरती आग विझवायला पळतय' अशी मोदींना हरवण्याची भाषा करणाऱ्यांची गत झाली असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. सरकारने दिलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) टिकेल आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्याचप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू असून सगेसोयरे कायद्यावरही काम सुरू असल्याचंही त्यांनी या सभेत सांगितलं.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com