पंतप्रधान व्हावं, असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं स्वप्न होतं. पण, नरेंद्र मोदी आणि अमित शाह ( Amit Shah ) यांनी फडणवीसांचं स्वप्न आवडलं नाही. त्यामुळे मोदी आणि शाहांनी फडणवीसांचे पंख छाटून महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केलं, असा खळबळजनक दावा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला. पण, महाराष्ट्राच्या नेत्याला पंतप्रधानपदावर नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल, तर आम्ही नक्कीच पाठीशी उभे राहू, असं संजय राऊतांनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
'आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांना मुख्यमंत्री काय मंत्री करायला सुद्धा मला वेड लागलं नाही,' असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केलं होतं. याबद्दल विचारल्यावर संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, "प्रत्येक वेडा मी वेडा नसल्याचं सांगतो. गुन्हेगारही गुन्हा केल्याचं कबूल करत नाही. हा मानवी स्वभाव आहे. त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीस वेगळे नाहीत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी बसवून मी दिल्लीत जाणार, असं फडणवीस म्हटलं होतं. दिल्लीत अर्थमंत्री, गृहमंत्री आणि प्रधानमंत्री बनण्याचं फडणवीसांचं स्वप्न होतं."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो. फडणवीसांचं स्वप्न मोदी आणि शहांना आवडलं नाही. त्या स्वप्नांचे पंख कापून फडणवीसांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केलं. मोदी आणि शहांनी फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं. यालाच मोदी आणि शहांची राजनिती म्हणतात," असं राऊतांनी म्हटलं.
"'इंडिया' आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी खूप चेहरे आहेत. पण, आम्ही पंतप्रधानपदावर कधीच चर्चा करत नाही. राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं, असं आम्हाला वाटतं. पण, ते काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा प्रचार करत आहेत. त्यांना सत्तेचा लोभ नाही," असं राऊतांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.