Pankaja Munde News : पंकजा मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक, बीडमध्ये दाखवले काळे झेंडे अन्...

Lok Sabha Election 2024 : बीड लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे जिल्ह्यात आल्या.
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक, बीडमध्ये दाखवले काळे झेंडे अन्...
Published on
Updated on

Beed News : सरकारनं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले असले, तरी समाजात नाराजी आणि संताप कायम दिसत आहे. याचा प्रत्यय वारंवार येत असून भाजपच्या राष्ट्रीय सचिव व लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांचा ताफा जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. हा प्रकार बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथे शनिवारी ( 23 मार्च ) घडला. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) जिल्ह्यात आल्या. त्यांनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे ( Pritam Munde ) यांच्यासह विविध ठिकाणी गाठी-भेटी आणि धार्मिक स्थळांचे दर्शन सुरु केले आहे. त्या नारायणगाडवर दर्शनासाठी गेल्या. परत बीडला येताना साक्षाळपिंपरी येथील मराठा आंदोलकानी त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखविले. पोलिसांनी त्यांना बाजूला केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी 'एक मराठा, लाख मराठा', अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या. आंदोलक आक्रमक झालेले पाहून त्यांचा ताफा सरळ बीडला निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघण, आचारसंहिता असतानाही विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून भरत बबन काशीद, शशिकांत परसराम काशीद, श्रीराम बंडू काशीद, अक्षय अजिनाथ काशीद, ज्ञानेश्वर हौसराव काशीद यांच्यासह अनोळखी 8 ते 10 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.

Pankaja Munde News : पंकजा मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक, बीडमध्ये दाखवले काळे झेंडे अन्...
Beed News: बीडमध्ये नवीन ट्विस्ट; सोनवणे, मेटेंच्या उमेदवारीचा वाटेत 'निष्ठावंतांचा' स्पीड ब्रेकर

दरम्यान, जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने गुन्ह्यांचे सत्र सुरूच आहे. जमावबंदीचे निमित्त करून गुन्हे नोंद केले जात असल्यानं समाजातून संताप व्यक्त होत आहे

Pankaja Munde News : पंकजा मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक, बीडमध्ये दाखवले काळे झेंडे अन्...
Pankaja Munde: माझं तिकीट राज्यानं नव्हे देशानं ठरवलं; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com