Congress Marathwada Politics : आमदार, खासदार नसलेल्या संभाजीनगरात जमणार काॅंग्रेसचे बडे नेते...

Congress Leaders News : गेल्या काही वर्षांत काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी स्थानिक नेत्यांनी केल्या होत्या.
Congress Marathwada Politics News
Congress Marathwada Politics NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Political News : देशातील सर्वात मोठा पक्ष आणि सर्वाधिक सत्ता उपभोगलेल्या काॅंग्रेस पक्षाने नव्याने संघटनात्मक बांधणीचे काम हाती घेतले आहे. (Congress News) यासाठी प्रत्येक राज्यात समिती गठीत करण्यात आली असून, त्या-त्या राज्यातील नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मराठवाड्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आहे.

Congress Marathwada Politics News
Aditya Thackeray Tour : आदित्य ठाकरे घाटीसह नांदेड-नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला भेट देणार...

कधी काळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाची दुरवस्था झाली आहे. (Marathwada) एकही आमदार, खासदार नसलेल्या या जिल्ह्यात काॅंग्रेस नव्याने पक्षवाढीच्या कामासाठी लागली आहे. त्यासाठी मंगळवारी १० आॅक्टोबर रोजी राज्यातील काॅंग्रेसचे (Congress) सगळे बडे नेते शहरात येणार आहेत. जिल्हास्तरीय संघटनात्मक आढावा घेण्यासाठी विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, (Ashok Chavan) माजी मंत्री अमित देशमुख, नसीमखान, बसवराज पाटील मुरुमकर, महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पक्षाचे समन्वयक माजी मंत्री अनिल पटेल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने विभागनिहाय बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार मंगळवार, विभागीय बैठक होणार आहे. बैठकीत जिल्हास्तरीय मंडळ कमिटी, बूथ कमिटी, ग्रामसमिती, ब्लॉक समितीसह संघटनेतील रिक्त पदे, आगामी लोकसभा आणि विधानसभा मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण, शहर आणि जिल्हा कमिटीचे प्रोसेडिंग बुकची तपासणी करण्यात येणार आहे. प्रदेश कॉंग्रेस कमिटीने नेमून दिलेली कामे, त्यातील काही उणिवा आणि त्रुटी याची माहिती बैठकीत घेतली जाईल. कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी विविध विभागाचे सेल, फ्रन्ट यांचीही माहिती नेते घेणार आहेत.

जिल्हास्तरीय असलेल्या निरीक्षकांकडून याचा अहवाल घेऊन तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केला जाईल. या बैठकीसाठी आजी, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, फ्रंटचे अध्यक्ष, पदाधिकारी आदींना निमंत्रित करण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी स्थानिक नेत्यांनी केल्या होत्या. त्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होत नाही, पण राज्यातील नेत्यांचे पाय जिल्ह्याला लागणार आहेत, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.