Marathwada Politics : मराठवाड्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ! शरद पवारांचे खंदे समर्थक दांडेगावकरांचा मुलगा भाजपच्या वाटेवर?

Dandegaonkar son political switch : मराठवाड्याच्या राजकारणात मोठी घडामोड. शरद पवारांचे खंदे समर्थक दांडेगावकर यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार का? जाणून घ्या संपूर्ण राजकीय अपडेट.
Jayprakash Dandegaonkar
Jayprakash DandegaonkarSarkarnama
Published on
Updated on

मराठवाड्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कुटुंबात राजकीय बदलाची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या सुपुत्र आतिश दांडेगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघात जयप्रकाश दांडेगावकर हे एक मोठ प्रस्थ आहे. त्यांनी 2 वेळा आमदार म्हणून काम केले असून सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात आपला ठसा उमटवला. शरद पवार यांच्याशी असलेली त्यांची निष्ठा आणि जवळीक ही राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.

Jayprakash Dandegaonkar
Nanded News : मोठी बातमी: नांदेडचा ढाण्या वाघ आता शिवसेनेसोबत! शेकडो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

मात्र 2014 मधील पराभवानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला काहीसा धक्का बसला. 2019 मध्ये पक्षाने उमेदवारीत बदल केल्याने ते नाराज असल्याचे बोलले गेले. 2024 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरून जोरदार प्रयत्न केले, पण यश हुकले. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या मुलाचा भाजपकडे झुकाव हा मोठा राजकीय संकेत मानला जात आहे.

आतिश दांडेगावकर हे ‘कपिश्वर शुगर’चे अध्यक्ष असून त्यांनी स्थानिक पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. माळवटा येथे 16 तारखेला समर्थकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे सांगितले जाते. 24 फेब्रुवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळात या घडामोडींमुळे वसमत आणि हिंगोली जिल्ह्यातील राजकारण कोणत्या दिशेने वळणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com