Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे यश; आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख मंजूर

Manoj Jarange Patil, Maratha quota : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत.
Manoj Jarange patil
Manoj Jarange patilsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र आणि त्या आधारे मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण लागू करा, या व इतर मागण्यासाठी आतापर्यंत नऊ वेळा उपोषण केले. हैदराबाद गॅझेटनूसार नोंदी घेण्याच्या जीआरची अंमलबजावणी, सातारा, कोल्हापूर, औंध गॅझेट, मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय, आंदोलना दरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी, बलिदान दिलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी अशा विविध मागण्यासाठी जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी अंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात उपोषण केले होते.

सरकारच्या वतीने मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर 12 मुद्यांचा समावेश करत त्याचा मसुदा आणि त्याचे जीआरमध्ये रुपांतर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. त्या पैकी मराठा आरक्षण मागणीसाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान देण्याची मागणी सरकारने मंजूर केली आहे.

बलिदान देणाऱ्यांच्या 34 वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यासाठी एकूण 3 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आठ जिल्ह्यांतील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या आंदोलनात 309 जणांचा मृत्यू झाला होता.

Manoj Jarange patil
RBI policy : राहुल गांधींना आर्थिक त्सुनामीची भीती, आता रिझर्व्ह बँकेने वाढविले सर्वसामान्यांचे टेन्शन; मोदी सरकारही चिंतेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 34 व्यक्तींच्या कुटुंबांना मदत मिळणे अद्याप बाकी होते. अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मृतांच्या वारसदारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा प्रश्न उपस्थित केला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उर्वरित वारसांना तातडीने मदत देण्याची ग्वाही देण्यात आली होती.

Manoj Jarange patil
MLA verdict : कोर्टाचा अभूतपूर्व निकाल, 10 वर्षांनंतर आमदारकी रद्द; पराभूत उमेदवाराला केलं विजयी घोषित

त्यानंतर आज राज्य सरकारकडून तातडीने मदत मंजूर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक 15 मराठा कार्यकर्त्यांनी बलिदान दिले होते. धाराशिव 5, परभणी 4, हिंगोली 4, नांदेड 3, जालना 1, छत्रपती संभाजीनगर 1 आणि लातूर 1 अशा बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना ही आर्थिक मदत दिला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com