Beed News: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. आंदोलन काळात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. त्यामुळे राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत होता.
या आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या. बीडमधील आंदोलक आक्रमक झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. मात्र, आता दगडफेक आणि जाळपोळीच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले. यानंतर आता जरांगे पाटलांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यातच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जाळपोळीच्या घटनेबाबत महत्त्वाची माहिती सांगितली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"बीडमध्ये ज्या जाळपोळीच्या घटना घडल्या, त्यामध्ये काही निष्पाप लोकांना अटक होऊ नये, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे. यावर आमची सविस्तर चर्चा झाली. मात्र, आम्ही आतापर्यंत कोणत्याही निष्पाप व्यक्तीला अटक केली नाही. मात्र, त्यांनी काही जणांची नावे सांगितले आहेत, त्याचीदेखील पुन्हा एकदा चौकशी करून आम्ही योग्य ती कारवाई करू. जी जाळपोळ झाली, त्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता निपक्षपातीपणे आम्ही चौकशी करून कारवाई करत आहोत", अशी माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये दाखल झाले असून, बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जरांगे पाटलाच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात झाली, तर मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेनंतर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वरील माहिती दिली.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा लढा पुकारून सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्यभर दौरा सुरू केला आहे. ते राज्यभरात दौरे करून विविध जिल्ह्यात सभा घेणार आहेत. या वेळी जरांगे मराठा आऱक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांचाही ते समाचार घेणार असल्याची शक्यता आहे.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.