Manoj Jarange Hunger Strike Stop : मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताना सरकारसमोर ठेवल्या 'या' अटी!

Maratha Reservation: जाणून घ्या, सरकारकडून आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर जरांगे पाटलांनी काय दिलाय इशारा?
Manoj Jarange Patil PC
Manoj Jarange Patil PC Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज उपोषण स्थगित केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केल्यानंतर, जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांची म्हणजेच २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, ही मुदत देत असताना जरांगे पाटील यांनी काही महत्त्वपूर्ण अटी घातल्या आहेत.

धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, संदीपान भुमरे या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे गेलं होतं. त्यापूर्वी दोन माजी न्यायमूर्तींनी त्यांच्याशी चर्चा केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil PC
Maratha Reservation: मोठी बातमी ! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला दिली नवी डेडलाइन

उपोषण स्थगित करताना मनोज जरांगे यांनी ''मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, आमरण उपोषण जरी स्थगित झालं असेल तरी साखळी उपोषण सुरूच राहणार, आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील,'' या काही अटी मांडल्या आहेत.

याशिवाय जरांगे यांच्याशी चर्चा करताना ८ डिसेंबरनंतर विशेष अधिवेशन बोलावू, असा शब्द सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच यामध्ये विधिमंडळात सर्वपक्षीय नेते एकमताने प्रस्ताव मांडतील, असेही आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.

Manoj Jarange Patil PC
Manoj Jarange News : अकरा छर्रे शरीरात घुसले तेव्हा झाला नाही, त्यापेक्षा कितीतरी पट त्रास जरांगे पाटलांची अवस्था पाहून होतोय...

याचबरोबर ''दोन महिन्यांनी काय होतं ते पाहू, मागील ३५-४० वर्षे आपण वाट पाहिली आता आणखी दोन महिने वाट पाहू. मात्र, आता यांनी दगाफटका केला तर आपण यांच्या(सरकारच्या) पूर्ण नाड्या बंद करू. आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक नाड्या बंद करू, म्हणजेच मुंबईची नाकेबंदी करू. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना ‘चलो मुंबईचा नारा देऊ, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com