Nanded Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात विविध प्रकारे आंदोलने सुरू आहेत. अनेक गावांत खासदार, आमदारांना गावबंदी करण्यात आली असून, तशा प्रकारचे फलकही लावण्यात आले आहेत. (Maratha Protest) आमदारांना अडवून कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी काय केले? याचा जाब विचारला जात आहे. याचा फटका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन, कंधार- लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनाही बसला आहे.
अर्धापूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयाच्या समोर आठ दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. (Nanded) या उपोषणात सहभागी होण्यासाठी मेंढला खुर्द, मेंढला बुद्रुक, गणपूर येथील नागरिकांनी बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात अबालवृद्धांचा समावेश होता. (Maratha Reservation) तसेच रेडा, गाढवं, ट्रॅक्टर, जीप, दुचाकी आदीही मोर्चात आणण्यात आल्या होत्या.
तिन्ही गावांतील छोटी मुलं, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, सजवलेल्या बैलगाडी, जीप, दुचाकी, ट्रॅक्टरमधून वाजंत्री वाजवत सहभागी आले होते. (Marathwada) आंदोलकांनी रेड्याच्या पाठीवर सरकाराचा निषेध करणारे वाक्य रंगवण्यात आले होते, तर गाढवांच्या गळ्यात सरकारच्या निषेधाच्या पाट्या अडकवण्यात आल्या होत्या.
याशिवाय उपोषणस्थळी प्रसिद्ध कीर्तनकांराचे कीर्तन, विविध गावांतील भजनी मंडळ आरक्षणाचा जागर करीत आहेत. उपोषणस्थळी खासदार हेमंत पाटील, भाऊरावचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी भेट दिली व मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. तसेच या उपोषणाला अर्धापूर तालुका वकील संघाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र व त्याआधारे आरक्षण या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषण सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देत पुढच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. शिवाय राज्यात जिथे जिथे शक्य होईल तिथे आपण आंदोलन, उपोषण करणाऱ्या समाज बांधवांची भेट घेणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. सरकारला दिलेली मुदत संपताच जरांगे अंतरवाली सराटी भागात भव्य सभाही घेणार आहेत. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.