Prakash Solanke News : आमदार सोळंकेंचा बंगला पेटवल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; तरुणाला घेतले ताब्यात

Majalgaon Incident : तो मूळचा धारूर तालुक्यातील धुलकवड या गावचा रहिवासी आहे.
MLA Prakash Solanke
MLA Prakash Solanke Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : माजलगाव (जि. बीड) येथील आमदार प्रकाश सोळंकेंचा बंगल्या जाळल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत तापलेला असताना माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी फोनवर बोलून त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या व्हायरल झालेल्या क्लिपनंतर आमदार सोळंके यांचे राहते घर पेटवून देण्यात आले होते. (Maratha Reservation : youth who made audio clip of MLA Prakash Solanke viral has been detained by police)

सुंदर भोसले असे या तरुणाचे नाव आहे. त्याला माजलगाव येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो मूळचा धारूर तालुक्यातील धुलकवड या गावचा रहिवासी आहे. आता पोलिस त्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Prakash Solanke
Maratha Reservation : मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर; सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बोलावली बैठक

सुंदर भोसले या तरुणाने आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी फोनवर बोलून तो संवाद रेकॉर्ड केला होता. त्या संवादाची ऑडिओ क्लिप बनवून ती व्हायरल करण्यात आली होती. त्यानंतर जमावाने आमदार सोळंके यांच्या घरावर प्रथम दगडफेक केली होती. त्यानंतर घराला आग लावून ते पेटवून देण्यात आले होते.

MLA Prakash Solanke
Kolhapur Water Supply Issue : कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनच्या मुख्य वीजपंपाची वायर कापली; घटनेमागे राजकारण असल्याची चर्चा

जमावाने लावलेल्या आगीत आमदार सोळंके यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले होते. तसेच, पार्किंगमध्ये लावण्यात आलेली वाहनेही पेटवून देण्यात आली होती. त्याच दिवशी सायंकाळी आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा कारखाना, कार्यालय आणि घरही पेटविण्यात आले होते. त्यामुळे शांतेत चालेल्या मराठा आरक्षणाला गालबोट लागले होते.

MLA Prakash Solanke
Raver Loksabha : नाथाभाऊंनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले; रावेरमधून निवडणूक लढण्याची तयारी

हल्ला झाला, त्यावेळी बंगल्यात असणारे आमदार प्रकाश सोळंके यांनी माझ्या घरावर मराठा समाजाच्या तरुणांनी हल्ला केला नाही, तर माझ्या राजकीय विरोधकांनी डाव साधला आहे. त्या गर्दीत मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हते, तर विरोधकांचे कार्यकर्ते होते. उलट त्या हल्ल्यातून आणि जाळपोळीतून मला मराठा समाजाच्या तरुणांनीच वाचविले, असेही आमदार सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते, त्यामुळे सोळंके यांच्या बंगल्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिस काय कारवाई करणार, याकडे बीडचे लक्ष लागले होते.

MLA Prakash Solanke
Maharashtra Politics : महायुतीच्या आमदारांची ‘वर्षा’वर खलबतं; मुख्यमंत्री देणार कानमंत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com