

Marathwada Graduate Constituency: राज्यातील पाच पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते. त्यानुसार तीन जागा भाजपा तर प्रत्येकी एक जागा महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीला देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगरपैकी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, नेते आक्रमक झाले आहेत.
ही जागा कोण लढवणार? हे महायुतीने अद्याप अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी यावरून दोन्ही पक्षात तानातानी असल्याचे चित्र आहे. त्यातुनच भाजपाच्या इच्छुकांनी सहा अर्ज खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या ६६ इच्छुकांनी तब्बल ११६ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले आहेत.
अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू झाली असून तिसऱ्या दिवशीपर्यंत नेलेल्या ११६ अर्जांपैकी १ ऑक्टोबर रोजी केवळ दोनच अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आली. नामनिर्देशन अर्ज खरेदी केलेल्यांमध्ये सर्वाधिक म्हणजेच ४३ अर्ज हे अपक्ष आहेत.
तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.१) २० जणांनी ४० अर्ज खरेदी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षासाठी २ इच्छुकांनी अर्ज घेतले. यासोबतच ऑल इंडिया इंन्कलाब पार्टी, राष्ट्रीय किसान परिषद, जय सेवालाल बहूजन पार्टी, भाकप, रिपाई आदि पक्षांच्या प्रत्येकी १ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी तिसऱ्या दिवशी विक्री झालेल्या ११५ अर्जांपैकी दोन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये बाबासाहेब भुजंगराव उगले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, तर एक अर्ज हा एका पक्षाकडून दाखल करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणीच नसल्याचे समोर आले आहे.
भाजप - ६
काँग्रेस - २
शिवसेना - १
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष - १
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- २
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- १
वंचित- १
अपक्ष - ४३
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.