Diveagar Incident: कोकणात मोठी दुर्घटना! दिवेआगारच्या समुद्र किनारी सहलीला गेलेले आळंदीतील ८ विद्यार्थी बुडाले

Diveagar Incident: पुणे जिल्ह्यातील आळंदी इथल्या एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल दिवेआगार इथल्या समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेली होती.
Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Diveagar Beach Drawn 8 Students from Pune AlandiDiveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Published on: 
Updated on: 

Diveagar Incident: कोकणात मोठी दुर्घटना घडली असून प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगार समुद्रात पुण्यातून सहलीसाठी आलेल्या खासगी क्लासचे ८ विद्यार्थी बुडाले आहेत. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आळंदीतील 'विनर्स अकॅडमी या पोलीस अकॅडमी'तील ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक असे एकूण ४४ जण दिवेआगार इथं सहलीसाठी गेले होते. सहलीला गेलेले विद्यार्थी हे इयत्ता अकरावी-बारावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी होते. या ठिकाणी वॉटरस्पोर्ट्स बंद असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Maharashtra Political Update : देश-विदेशात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा नाही - आमदार

स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं की, "दिवेआगारमध्ये ८ विद्यार्थी बुडाल्याची घटना ही अत्यंत दुर्देवी आहे. अनेकदा इथं अशा घटना घडल्या आहेत, स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली नसल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक किंवा सुरक्षेची कुठलीही यंत्रणा नव्हती, हे यातून स्पष्ट झालं आहे. वारंवार अशा घटना इथं घडल्या असून यामुळं विनाकारण आमच्या जिल्ह्याचं नाव बदनाम होत आहे"

Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Jyoti Waghmare: ठाण्यातील पुर्णेकर हत्याकांड प्रकरणी खासदार ज्योती वाघमारे संजय राऊतांवर संतापल्या; 'त्या' खटल्याची करुन दिली आठवण

पोलीस प्रशिक्षण अकॅडमीचे विद्यार्थी

तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी या घटनेबाबत सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार आळंदीतील पोलीस प्रशिक्षण विनर अकॅडमीतील हे प्रशिक्षणार्थी होते. यामध्ये एक जण बुडाला त्याला वाचवण्यासाठी इतर काही जण गेले त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ८ जणांचे मृतदेह हाती आले असून ते बोर्लीतील रुग्णालयात आणण्यात आले आहेत. स्थानिक रहिवाशांनी इथं बचाव कार्य राबवलं तसंच त्यांच्या मदतीला नंतर पोलीसही दाखल झाले. त्याचबरोबर महसूलचे काही कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी मदत कार्य राबवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com