Sanjay Raut: "या लेडी डॉन ला कोण वाचवतेय?" पूर्णेकर हत्याकांड प्रकरणी संजय राऊतांचा सवाल; शेअर केली खळबळजनक ऑडिओ क्लीप

Sanjay Raut: ठाण्यातील ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पूर्णेकर कुटुंबानं शिंदेसेनेच्या नेत्या, ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे या हत्येमागच्या सूत्रधार असल्याचा दावा केला आहे.
Meenakshi Rajendra Shinde_Pradeep Purnekar Murder Case
Meenakshi Rajendra Shinde_Pradeep Purnekar Murder Case
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut: ठाण्यातील ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी पूर्णेकर कुटुंबानं शिंदेसेनेच्या नेत्या, ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी दाखल FIR मध्ये मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या नावाचा समावेश करावा अशी मागणी दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलानं काल पोलीस स्टेशनमध्ये केली.

दरम्यान, संजय राऊत यांनी आज मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. या क्लीपमध्ये त्या अत्यंत अश्लील पद्धतीनं शिवीगाळ करताना तसंच मारहाण करण्याची भाषा करताना ऐकू येत आहेत. संजय राऊतांनी हा दावा केलेला असला तरी सरकारनामा या ऑडिओची पुष्टी करत नाही.

संजय राऊतांनी ऑडिओ क्लीप शेअर करताना पोस्टही केली आहे. यात ते म्हणतात, "ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे. त्या मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांची भाषा पहा, ठाण्याच्या पोलीस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन असे ही बाई धमक्या देत आहे. पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय. हीची अटक कधी होणार? ठाण्याचे आता 'बीड' झाले आहे. या 'लेडी डॉन'ला कोण वाचवतंय? पूर्णेकरांच्या हत्येचा आणखी काय पुरावा पोलिसांना हवाय? अमित शहांनी कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र? ठाणेकरांनो जागे व्हा... बोला... व्यक्त व्हा... रस्त्यावर उतरा...जय महाराष्ट्र!"

Meenakshi Rajendra Shinde_Pradeep Purnekar Murder Case
Jyoti Waghmare: ठाण्यातील पुर्णेकर हत्याकांड प्रकरणी खासदार ज्योती वाघमारे संजय राऊतांवर संतापल्या; 'त्या' खटल्याची करुन दिली आठवण

दरम्यान, ऑडिओ क्लीपमध्ये फोनवरचा संवाद आहे. यामध्ये एका बाजुला एक महिला बोलत आहे तर दुसऱ्या बाजूनं एक पुरुष बोलत आहे. संबंधित महिला या पुरुषाला जाब विचारत आहे. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीच्या घरात बायका पाठवून त्याला मारहाण करायला सांगेन. तसंच "मानपाड्यात मी दिसते तेवढी नाही, माझी लेव्हल बघायची असेल ना तर दुसऱ्याच दिवशी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन करुन काय याची वाटेल लावेन ते तुला पण कळायचं नाही" अशा पद्धतीनं या संजय राऊतांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लीपमध्ये संवाद आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com