Uddhav Thackeray name in voter list : मतदार यादीत दोनदा ‘उद्धव ठाकरे’; बीडमध्ये नेमका काय प्रकार?

Two voter-list entries in Beed mention ‘Uddhav Thackeray’, prompting a complaint from the Thackeray faction : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रारूप यादीतील दोन नोंदींवर ठाकरे गटाचा आक्षेप; निवडणूक कार्यालयाकडे दुरुस्तीची मागणी
Marathwada Graduate Constituency
Marathwada Graduate ConstituencySarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra MLC election 2026 : राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मतदार याद्यांमधील चुकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या बीड जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादीत काही मतदारांच्या नावांसमोर ‘उद्धव ठाकरे’ हे नाव आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे बीडमध्ये चर्चेला उधाण आले असून, निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत बीड (BEED) जिल्ह्यातील अनुक्रमांक 448 वर ‘ऋषिकेश उद्धव ठाकरे’ असे नाव आढळले आहे. त्यासमोर ‘उलथापालथ करा’ अशी नोंदही करण्यात आली आहे. तर अनुक्रमांक 150 वर ‘ओंकार उद्धव ठाकरे मस्के’ असे नाव असल्याचे समोर आले आहे.

या दोन्ही नोंदींमध्ये ‘उद्धव ठाकरे’ हे नाव कसे आले, यावरून आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. मतदार यादी (Voter List) तयार करण्याच्या प्रक्रियेत अशा प्रकारच्या चुका कशा झाल्या, याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे. यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशासकीय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Marathwada Graduate Constituency
Vikhe Thorat ADCC Bank seat sharing : अहिल्यानगर जिल्हा बँकेचा आज फैसला; 7 जागांवर विखे-थोरातांचा तिढा, जगतापांची भूमिका निर्णायक?

या प्रकारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार दिलीप हरिभाऊ घुगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मतदार यादीतील या त्रुटींबाबत त्यांनी निवडणूक कार्यालयाकडे तातडीने तक्रार करून दुरुस्तीची मागणी केली आहे. एका ठिकाणी अशी चूक झाली असती तर ती अनवधानाने झालेली चूक मानता आली असती. मात्र, दोन वेगवेगळ्या नोंदींमध्ये ‘उद्धव ठाकरे’ हे नाव आल्याने या प्रकाराची गांभीर्याने चौकशी करण्याची गरज असल्याचे घुगे यांनी म्हटले आहे.

Marathwada Graduate Constituency
Shiv Sena Sagar Bharuka : हॉटेलमध्ये गोंधळ, 15 लाखांच्या खंडणीची मागणी? शिंदेच्या शिवसेनेचा सागर भारुका अटकेत

मतदार यादीतील केवळ नावांमध्येच नव्हे, तर अनेक मतदारांच्या निवास पत्त्यांमध्येही चुका असल्याचा आरोप घुगे यांनी केला आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व नोंदींची योग्य पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

23 ऑक्टोबरला मतदान

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण पाच विधान परिषद जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी आणि निवडणूक रणनीतीवरून धुसफूस सुरू असतानाच आता मतदार याद्यांमधील त्रुटींचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

दुरुस्ती कशी होणार

बीडमधील मतदार यादीतील या नोंदींबाबत शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीपूर्वी निवडणूक यंत्रणा या तक्रारीवर कोणती कारवाई करते आणि संबंधित नोंदींमध्ये काय दुरुस्ती केली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मतदार याद्यांमधील त्रुटींवरून यापूर्वीही विरोधकांनी निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे बीडमधील या प्रकरणावर निवडणूक आयोगाची अधिकृत भूमिका काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com