Marathwada youth suicide: मराठवाडा हादरला: 'ओबीसींचे आरक्षणच संपले', म्हणत युवकाने जीवन संपवले; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती

OBC reservation issue Maharashtra News : सरकार ओबीसी विरोधी आहे. माझ्या कुटुंबियांना व ओबीसी समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी करीत भरत कराड याने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.
Bharat Karad
Bharat Karad Sarkarnama
Published on
Updated on

Latur News : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून सरकारने ओबीसींचे आरक्षण संपविले आहे. आता ओबीसींच्या आरक्षणाचे कसे, अशी चिंता व्यक्त करत व घोषणा देत बुधवारी ( ता. 10 ) सायंकाळी वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड (वय 35) या तरुणाने आता ओबीसींच्या आरक्षणाचे कसे, अशा घोषणा देत मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. त्याने ओबीसींच्या आरक्षणाबाबत चिंता व्यक्त करणारी चिट्टी देखील लिहून ठेवली आहे.

भरत महादेव कराड (रा. वांगदरी ता. रेणापूर) हा युवक ऑटो चालवून किंवा इतर वाहनांवर चालक म्हणून काम करणारा तरूण असला तरी तो गेली काही वर्षांपासून ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात प्रत्येक आंदोलनात हिरीरीने भाग घेवून सहभागी होत होता. सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसींचे आरक्षण कायमस्वरूपी संपविले आहे. मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला व ओबीसी समाजाला न्याय मिळावा असा मजकूर त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आहे.

Bharat Karad
Modi birthday Pune highlights : पुण्याच्या अवकाशात मोदींच्या वाढदिवसानिमित्त हजारो ड्रोनचा थरार! खासदार मोहोळांनी घेतलाय पुढाकार!

मांजरा नदीपात्रात घोषणा देत ओबीसींना आरक्षण (OBC) पाहिजे, सरकार ओबीसी विरोधी आहे. माझ्या कुटुंबियांना व ओबीसी समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी करीत भरत कराड याने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. यावेळी अविनाश गंभीरे व अंतराम मुंडे यांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी दोन वाजता वांगदरी येथे भरत कराड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम उपस्थित होते.

Bharat Karad
Uddhav Thackeray News : राज ठाकरेंशी वाढता 'घरोबा', उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? मनसेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत

अंत्यसंस्कारावेळी घोषणाबाजी

भरत कराड यांच्या अंत्यविधीच्या वेळी गाव व परिसरातील शोकाकूल नागरिकांनी ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, भरत कराड यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशाही घोषणा दिल्या. भरत कराड याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्याकडे अवघी 2 गुंठे जमीन असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Bharat Karad
BJP leader Uddhav Nimse: भाजपला धक्का, खून प्रकरणात माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन फेटाळला.

तहसीलदारांना दिले निवेदन

वांगदरी येथे आलेले तहसीलदार थोरात यांना लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात मृताच्या तीन मुली व एका मुलाचा शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेऊन तात्काळ 25 लाखाची मदत कुटुंबांना द्यावी व मयताच्या पत्नीस शासकीय नोकरीत घेण्यात यावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Suicide Note
Suicide Note Sarkarnama
Bharat Karad
NCP Vs BJP : 'तुम्ही निवडून आलात हाच राजकीय अपघात, आता चोराच्या उलटा बोंबा बंद करा', फडणवीस आणि दादांचे नेते थेट भीडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com