Massajog Gram Panchayat Election : मस्साजोगच्या निवडणुकीत 'बिनविरोध'ची आशा मावळली; सरपंच पदासाठी दोन देशमुख भिडणार

Santosh Deshmukh News: मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून ही निवड बिनविरोध व्हावी आणि सरपंच पदावर अश्विनी देशमुख यांना संधी द्यावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.
Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Google
Published on
Updated on

Beed Politics News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दीड वर्षांनी होऊ घातलेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. ही निवड बिनविरोध व्हावी, यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थ, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पाच पैकी तीन उमेदवारांनी माघारही घेतली. परंतु स्वरूपानंद देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरुपानंद यांच्या सरपंच पदासाठी थेट लढत होणार आहे.

मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून ही निवड बिनविरोध व्हावी आणि सरपंच पदावर अश्विनी देशमुख यांना संधी द्यावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.

धनंजय देशमुख, गावातील प्रतिष्ठित नागरीक, महिला, मतदार यांच्यात बैठकाही झाल्या. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजीवनी देशमुख, संतोष देशमुख यांच्या विरोधात केवळ 9 मतांनी पराभूत झालेले स्वरुपानंद देशमुख यांच्यासह पाच उमेदवार मैदानात उतरल्याने चुरस निर्माण झाली होती.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. पाचपैकी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु स्वरुपानंद देशमुख यांनी मात्र 9 एप्रिल रोजी सांगितल्याप्रमाणे माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे आता अश्विनी देशमुख आणि स्वरुपानंद देशमुख यांच्यात सरपंच पदासाठी थेट लढत होणार आहे. जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच 72 सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती.

Gram Panchayat Election
Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या टोमण्यामुळे सत्ताधारी-विरोधक खळखळून हसले; म्हणाले,'माझ्या अन् पंतप्रधान मोदींच्या आयुष्यात पत्नीची...'

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या झाल्याने हे पद रिक्त होते. सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी अश्‍विनी देशमुख यांच्यासह स्वरूपानंद देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख, पंजाब देशमुख व संजीवनी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज करुणा देशमुख, संजीवनी देशमुख व पंजाब देशमुख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अश्‍विनी देशमुख व स्वरुपानंद देशमुख यांच्यात लढत निश्‍चित आहे.

दरम्यान, अश्‍विनी देशमुख यांनी यापूर्वी मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच केज बाजार समितीच्या संचालक म्हणून काम केलेले आहे. त्यापूर्वी स्वरुपानंद देशमुख यांचेही ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते.

Gram Panchayat Election
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी सुनेत्रा पवारांचा 'मास्टरस्ट्रोक'! अमोल मिटकरींना डावलून नव्या चेहऱ्याला संधी देणार का? 'या' नेत्यांची नावे चर्चेत

मागच्या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या विरोधात त्यांचा नऊ मतांनी पराभव झाला होता. दरम्यान, ता. 28 एप्रिल रोजी मतदान व ता. 29 एप्रिल रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com