Sanjay Jadhav challenges Meghna Bordikar : मेघना बोर्डीकरांच्या 'त्या' दाव्यावर खासदार संजय जाधव भडकले; पुरावे सादर करण्याचं दिलं आव्हान

Meghna Bordikar allegation and proof demand: मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्यावर खासदार संजय जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्याचे त्यांनी खुले आव्हान दिले.
Sanjay Jadhav and Meghna Bordikar
Sanjay Jadhav and Meghna BordikarSarkarnama
Published on
Updated on

Shiva Sena BJP politics : परभणीचे खासदार संजय जाधव यांची पक्षांतरासाठी पहिली पसंती शिंदे यांची शिवसेना नव्हे तर भाजपा होती, असा दावा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संजय जाधव यांची भाजपात येण्याची इच्छा होती. परंतु नंतर काय झाले? माहित नाही ते शिंदेसेनेत गेले, असे विधान बोर्डीकर यांनी केल्यानंतर परभणी जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

Sanjay Jadhav and Meghna Bordikar
Maharashtra rain : मुसळधार पावसामुळे राज्यभरातील कोणकोणते रस्ते बंद? घरातून बाहेर निघण्यापूर्वी जाणून घ्या

यावर संजय जाधव यांनी मात्र आपण कधीही भाजपात जाण्याचा विचार केला नाही, पालकमंत्री मेघना बोर्डीकर किंवा राज्यातील कुठल्याही भाजपने त्यासोबत मी बोललो नाही किंवा या संदर्भात चर्चाही केली नाही. राज्यातीलच काय पण केंद्रातील कोणत्याही नेत्याशी भाजपा प्रवेश संदर्भात माझी कुठलीही चर्चा,भेट झालेली नाही.

त्यामुळे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी हा दावा कसा केला? हे त्यांनाच विचारा. भाजप प्रवेशासाठी मी कोण्या नेत्याला भेटलो असेल तर त्याचा फोटो, फोनवर बोललो असेल तर त्याची ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ असेल तर त्यांनी तो माध्यमांना दाखवावा, असे आव्हान संजय जाधव यांनी मेघना बोर्डीकर यांना दिले आहे.

मेघना बोर्डीकर यांनी जाधव यांच्या संदर्भात भाजपात येणार असल्याचे केलेला दावा गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही केला आहे याकडे जाधव यांचे लक्ष वेधले असता मग ही या दोघांची मिलीभगत आहे अशी थेट टीका संजय जाधव यांनी केली. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाईक आहे त्यामुळे मी इतर कुठल्या पक्षात नाही तर शिवसेनेतच प्रवेश केला आहे.

यापूर्वीही माझ्या बाबतीत उलटसुलट चर्चा झाल्या तेव्हाही मी भगव्यातच जगणार आणि भगव्यातच मरणार हे स्पष्ट सांगितले होते. महायुती म्हणून निश्चितच आम्ही भाजप सोबत आहोत. युतीधर्म पाळण्याचे काम यापूर्वीही आम्ही केलेले आहे आणि यापुढेही करू. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करणार होतो असा दावा मेघना बोर्डीकर आणि रत्नाकर गुट्टे यांनी कशाच्या आधारे केला? हे मला सांगता येणार नाही. ना मी भाजपात जाणार होतो, ना रत्नाकर गुट्टे यांच्या पक्षात, असेही खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.

Sanjay Jadhav and Meghna Bordikar
Shani Shingnapur App Scam : शनैश्वर देवस्थान कथित अ‍ॅप घोटाळा; न्यायालयाचे थेट राज्य सरकारला निर्देश, 8 आठवड्यांत निर्णय घ्या!

तुमच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजप नेत्यांची अडचण झाली आहे का? या प्रश्नावर तसे होण्याची काही आवश्यकता नाही, आणि मला तसे वाटतही नाही. महायुतीचा भाग असल्यामुळे जिल्ह्यात कितीही राजकीय मतभेद असले तरी आता जुळवून घ्यावे लागेल. एकमेकांना मदत करावी लागेल आणि ती आम्ही करत राहू असेही संजय जाधव यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com