MIMची वंचितविरोधात तक्रार! महापालिकेत डावललं गेल्याचा आरोप; भाजपवर साधला निशाणा

AIMIM Vs VBA : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षामध्ये सातत्याने खटके उडत आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Chhatrapati Sambhaji Nagar MahapalikaSarkarnama
Published on: 
Updated on: 

AIMIM Vs VBA: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षामध्ये सातत्याने खटके उडत आहेत. आता पुन्हा एकदा एमआयएमनं वंचितविरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे. पालिकेत आम्हाला डावललं जात असल्याचा गंभीर आरोपही एमआयएमनं भाजपवर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएम या पक्षाचे ३६ नगरसेवक आहेत. तर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे केवळ ४ नगरसेवक आहेत. पण तरीही महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनं वंचितला एमआयएमपेक्षा मोठं आणि प्रशस्त कार्यालयाचं वाटप केलं आहे. त्यामुळं आमच्या तुलनेत छोटा पक्ष असतानाही हा भेदभाव का? असा सवाल एमआयएमनं सत्ताधारी भाजपवर केला आहे.

त्याचबरोबर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना देखील वंचितचे गटनेते अफसर खान यांच्या महापालिकेतील दालनंचे उद्घाटन कसं काय केलं गेलं? असा सवाल करत एमआयएमनं थेट निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आता मसाल्यांच्या भेसळीकडं मोर्चा! नियम मोडल्यास तुरुंगवास अन्...; धडाकेबाज कारवाईला सुरुवात

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी निवडणूक आयोगाकडं केली आहे. महापालिकेतील वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान यांना दिलेल्या दालनावरून राजकारण पेटलं आहे. जनतेने कररूपानं भरलेल्या पैशांची उधळपट्टी करत प्रशासनानं या दालनावर एक कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप एमआयएमनं केला होता.

"केवळ चार नगरसेवक असताना एवढे मोठं दालन कसं काय दिलं? आमच्या पक्षाचे ३६ नगरसेवक असताना गटनेत्याला दालन मिळाले नाही? मंत्री अतुल सावे यांना अफसर खान यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केल्यानं त्यांचे लाड केले जात आहेत", असा आरोप समीर बिल्डर यांनी केला होता. हा वाद सुरू असतानाच बुधवारी (ता. १४) वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते अफसर खान यांच्या दालनाचं मोठ्या जल्लोषात उद्‍घाटन करण्यात आलं.

ढोल-ताशे वाजवून आणि फटाके फोडून आंबेडकरांचं महापालिकेत स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमावर बिल्डर यांनी आक्षेप घेतला आहे. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असताना दालनाचे उद्‍घाटन कसे करता येऊ शकते? असा प्रश्न करत याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडं केली असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडेदेखील तक्रार करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Gokul News: राधानगरीत मेव्हणे विरुद्ध पाहुणे! गोकुळमध्ये कार्यकर्ता, पत्नी-मुलांसाठी मंत्र्यांनी घेतलं मिटवून

महापौर, आयुक्त ठरवून गायब?

महापालिका मुख्यालयात हा कार्यक्रम सुरू असताना तत्कालीन महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे हे मुद्दाम महापालिकेत आले नव्हते. हा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनीच सूट दिली होती का? असा सवालही समीर बिल्डर यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

सध्याचे खासदार दिसतात कुठे?

वंचित बहुजन आघाडीने २०१९मध्ये शहरात एका पक्षासोबत युती करून मोठी चूक केली होती. ही चूक २०२४च्या निवडणुकीत संबंधित उमेदवाराचा पराभव करून आम्ही सुधारून घेतली, असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना बिल्डर म्हणाले, "कोणत्या एका व्यक्तीमुळं इम्तियाज जलील खासदार झाले नव्हते, जनतेनं त्यांना विजयी केलं होतं. खासदार असताना त्यांनी शहराचे अनेक प्रश्न मार्गी लावले, पण सध्याचे खासदार संसदेत दिसतात कुठे", असा सावलही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com