

Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना गेल्या सहा महिन्यांत अन्न भेसळीविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. आत्तापर्यंत मद्यभेसळ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ, खाद्यतेलांमधील भेसळ, औषधांमधील अनियमितता या मुद्द्यांवर धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. अनेकांचे परवाने निलंबित करुन चुकीची काम करणाऱ्या अनेक अस्थापनांना सील लावले. यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी मसाल्यांतील भेसळीकडं आपला मोर्चा वळवला आहे. व्यापाऱ्यांना नियमांची आठवण करुन देत धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे.
तुकाराम मुंढे पत्रकार परिषदेत म्हणाले, "मसाला पावडर व सुट्या मिश्र मसाल्यांची पॅकिंग स्वरुपातील विक्री नियमानुसार प्रतिबंधीत आहे. त्यामुळं जिथं या मसाल्याचं उत्पादन झालं ते एफडीएला शोधता येत नाही. त्यामुळं मसाल्यांचे योग्य प्रकारे पॅकिंग आणि सिलिंग करुनच त्याची विक्री करणं आवश्यक आहे. मसाल्यांमध्ये इथिलिन ऑक्साईडचा वापर प्रतिबंधित आहे. इथिलिन ऑक्साईडचा वापर काही ठिकाणी मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. पण यामुळं कर्करोगाला निमंत्रण मिळू शकतं. यापासून संरक्षण करण्यासाठी याच्या वापरावर प्रतिबंध आहे.
मसाल्यात किटकनाशकांचे अवशेष, अप्लाटॉक्सिन, जड धातू व इतर दुषित घटक यांची तपासणी करण्यात येईल, हे घटक जर मसाल्यांमध्ये आढळले तर संबंधित कंपनीवर कडक करवाई करण्यात येईल. जर याचं पालन केलं गेलं नाही तर जर मसाले सुरक्षित नसल्यास ७ वर्षांचा कारावास ते १० लाख रुपयांचा दंड, मसाल्यांमुळं गंभीर दुखापत झाल्यास ६ वर्षांचा कारावास, ५ लाखांपर्यंतचा दंड आणि असुरक्षित मसाले पण गंभीर दुखापत न झाल्यास १ वर्षांचा कारवास आणि ३ लाख रुपये दंड अशी कारवाईची तरतूद आहे. तसंच वैध परवाना नसणे, मसाले निकृष्ट दर्जाचे असणे, चुकीचे लेबल असणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती असणे यासाठी १० लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.