Pune Congress Politics : काँग्रेस आपलाच पारंपरिक मतदारसंघ विसरली अन् भाजपने संधी साधली

Congress-BJP Politics : राज्य पातळीवरील नेते पुण्यातील गणेशोत्सवात न फिरकल्याने आता त्याची मोठी चर्चा सुरू आहे.
Pune Congress Politics :
Pune Congress Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Pune Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी गणेशोत्सवात संधी साधली. त्यातही त्यांनी पुण्यात खास लक्ष घातले. त्याला राष्ट्रवादीचे दोन्ही नवे गटही अपवाद नव्हते. मात्र, सर्वात जुना पुणे हा लोकसभेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या काँग्रेसला मात्र त्याचा विसर पडला. त्यांचे राज्य पातळीवरील नेते पुण्यातील गणेशोत्सवात न फिरकल्याने आता त्याची मोठी चर्चा सुरू आहे.

Pune Congress Politics :
Pimpri Chinchwad Politics : दिलीप वळसेंच्या 'आदिवासी व्होट बँकेवर' शरद पवारांचा हातोडा; काय आहे राजकीय गणित ?

भाजपचे दोन नंबरचे वजनदार नेते आणि केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शाह, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह राज्यातील त्यांचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यातील गणेशोत्सवाला भेट दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे, तर दोन दिवस गणेश मंडळांना भेट देत होते. दोन्ही राष्ट्रवादीचे वजनदार नेत्यांनीही हजेरी लावली.

राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवा नेते रोहित पवार यांनी पुण्याचा गणेशोत्सव दौरा केला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अजित पवार यांनीही पुण्यात खास लक्ष घातले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा ना राष्ट्रीय पातळी ना राज्य पातळीवरील बडा नेता पुण्यात गणेशोत्सात फिरकला, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपचा गड कसबा हा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने नुकताच सर केला. तेव्हापासून लोकसभेचाही एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पुणे लोकसभेवर काँग्रेसने पुन्हा प्रबळ दावा ठोकला. कसब्याप्रमाणे येत्या लोकसभेला पुण्यातही विजय प्राप्त करू, असा दावा त्यांचे नेते करू लागले. पण त्याच्या तयारीची गणेशोत्सवाची चालून आलेली आयती संधी, मात्र त्यांनी सोडली. दुसरीकडे भाजपने ती नेमकी हेरली. त्यांना गिरीश बापट यांची ही जागा टिकवायचीच आहे. तशी जोरदार तयारी त्यांनी सुरू केली आहे. तशीच ती दोन्ही राष्ट्रवादीनेही सुरू केली आहे. असे असताना आघाडीत या जागेवर दावा ठोकणारी काँग्रेस मात्र काहीशी सुस्त राहिल्याचे दिसून आले. गणेशोत्सवात त्यांचा राज्य स्तरावरील नेता पुण्यात न आल्याने त्याला दुजोराच मिळाला आहे.

Edited By - Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com