

Mla Lonikar News : मतदारसंघातील रोहित्र व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे परतुरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर महावितरणच्या अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले. Jalna तुला मराठी भाषा समजत नाही का? तुला माज आलाय का? अशा भाषेत त्यांनी अधिकाऱ्याला दम भरला. त्यांच्या या दमबाजीचा आॅडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) तसे बोलायला फटकाळ. कधी महिला तहसिलदारांना तुम्ही हिरोईन सारख्या दिसता म्हटल्यामुळे तर कधी वीज बील थकल्यावर लाईट बंगल्याची लाईट केल्यावर लाईनमला तुला एका मिनिटात घरी पाठवीनची धमकी दिल्यामुळे लोणीकर या आधी देखील चांगलेच चर्चेत आले होते. (Marathwada) आता या नव्या आॅडिओची त्यात भर पडली आहे.
राज्याच्या विविध भागात सध्या कृषी पंपाची वीज तोडण्याची मोहीम महावितरण कंपनीने हाती घेतली आहे. खुद्द कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात देखील अशी मोहिम सुरू झाली होती. त्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली आणि आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडू नका असे आदेश दिल्याचे समजते. लोणीकरांच्या परतुर मतदारसंघात गावातील डीपी बंद करण्याचे प्रकार थकबाकीमुळे सुरू आहेत.
या संदर्भात लोणीकरांनी नुकताच उपअभियंता निलेश बेंडाळे यांना फोन केला होता. वारंवार सांगून, लेखी आदेश असूनही शेतकऱ्यांची वीज आणि डीपी बंद करण्याचे प्रकार सुरू असल्याने लोणीकर वैतागले होते. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. लोणीकर म्हणाले, तुम्हाला मराठी भाषेत सांगितलेलं कळत नाही का? तुम्हाला साहेब साहेब म्हणून सांगितलेलं कळत नाही ? जास्त माज चढला आहे का तुम्हाला.
आता हा माझा शेवटचा फोन असेल असेल. लेखी आदेश आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, तरी तुम्ही डीपी बंद करत सुटलेत. डीपीवरील एका शेतकऱ्याने जरी बील भरले असेल तरी ती बंद करायची नाही, असे आदेश आहेत. तुम्हीही सामान्य घरात जन्मलेले आहात. ताज महालमध्ये नाही, तेव्हा डीपी बंद करणे थांबवा.
अधिवेशनात एक प्रश्न टाकला तर तुम्ही सस्पेंड व्हाल, असा इशारा देखील लोणीकरांनी या उपअभियंत्याला दिला. आमदारसाहेबांचा चढलेला पारा पाहून समोरून फक्त हो सर असेच उत्तर येत होते. सध्या या दोघांमधील संभाषणीची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.