MP Om rajeNimabalkar : निकाल काहीही लागो, निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम...

Political News : तुमचा हा आनंद फक्त येणाऱ्या निवडणुकीपर्यंत. त्यानंतर जनतेच्या न्यायालयात होणार खरा न्याय.
 Om rajeNimabalkar
Om rajeNimabalkar Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Shivsena UBT : भगवान के घर देर हे, अंधेर नहीं, अशा शब्दांत ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर विधासनभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर भाष्य केले. निकाल काही लागू द्या, खरा निकाल जनतेच्या न्यायालयातच लागेल. निवडणुकीत जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला.

निकाल काहीही लागला तरी लोक सत्य जाणून आहेत. त्यामुळे तुमचा हा आनंद फक्त येणाऱ्या निवडणुकीपर्यंत. त्यानंतर जनतेच्या न्यायालयात होणार खरा न्याय आणि एक लक्षात ठेवा, ये पब्लिक है, ये सब जानती है. तुमचा या निवडणुकीत जनताच "करेक्ट कार्यक्रम" करणार हे निश्चित, असेही खासदार ओमराजे यांनी ठणकावून सांगितले.

 Om rajeNimabalkar
Sharad Mohol Case Update : शरद मोहोळ खून प्रकरणात नवा ट्विस्ट; तपासात पोलिसांकडून 'प्लँचेट'चा वापर?

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात निकाल दिला. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सगळ्या याचिका फेटाळल्या. एवढेच नव्हे, तर खरी शिवसेना शिंदेंचीच, असेही स्पष्ट केले. त्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना आणि ठाकरे गट समोरासमोर येत आहेत.

राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर सत्ताधारी जल्लोष करीत आहेत, तर ठाकरे गटाकडून लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याची टीका करीत सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले जात आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निकालावर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच भगवान के घर देर है, पर अंधेर नहीं, म्हणत जनतेच्या न्यायालयातच खरा निकाल लागणार असल्याचे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. शिंदे गटाकडून निकाल आमच्याच बाजूने लागणार, असा दावा आणि ठाकरे गटाने व्यक्त केलेली शंका दोन्ही खऱ्या ठरल्या आहेत. निकाल ठाकरेंच्याविरोधात, तर शिंदे गटाच्या बाजूने गेला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanajay Raut) यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R...

 Om rajeNimabalkar
Omprakash Rajenimbalkar: इच्छुकांची गर्दी, ओमराजे मात्र 'रिलॅक्स'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com