MPSC Paper Leak: 'एमपीएससी' प्रकरणात भाजप आमदार अभिमन्यू पवारांवर आरोप, समर्थनार्थ कट्टर विरोधक अफसर शेख उतरले मैदानात

Ausa MLA Abhimanyu Pawar: 'एमपीएससी' परीक्षा असो की विद्यार्थ्यांचे आंदोलन यामध्ये भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार नेहमीच मध्यस्थाच्या भूमिकेत असतात. पुण्यातील आंदोलनात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र, औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत पेपर फुटीच्या प्रकरणात याच अभिमन्यू पवार यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत.
Abhimanyu Pawar MPCSC Paper Leak Case
Abhimanyu Pawar MPCSC Paper Leak Case Sarkarnama
Published on
Updated on

जलील पठाण

Ausa Politics : 'एमपीएससी' परीक्षा असो की विद्यार्थ्यांचे आंदोलन यामध्ये भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार नेहमीच मध्यस्थाच्या भूमिकेत असतात. पुण्यातील आंदोलनात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र, औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत पेपर फुटीच्या प्रकरणात याच अभिमन्यू पवार यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत.

औसा मतदारसंघात त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निमित्ताने पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे, लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष तथा लातूरचे जिल्हाध्यक्ष डाॅ. अफसर शेख यांनी एखाद्याचा फोटो सोबत असेल म्हणून त्याचा थेट अशा प्रकरणाशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे म्हणत आमदार अभिमन्यू पवार यांची पाठराखण केली आहे.

औसा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते डॉ. अफसर शेख यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेत सध्या अनपेक्षित बदल पाहायला मिळत असून, त्याचीच चर्चा औशाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना निराधार, बेबुनियाद आणि तथ्यहीन ठरवत डॉ. अफसर शेख यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पोस्टरमधून आरोप करणाऱ्यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक राजकारणात पवार यांना सातत्याने लक्ष्य करणारे डॉ. शेख आता त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Abhimanyu Pawar MPCSC Paper Leak Case
Manda Mhatre Attack on Naik : मंदा म्हात्रेंचा मंत्री नाईकांवर हल्लाबोल : मैदानं विकली, तेव्हा मंत्री म्हणून झोपा काढल्या का? टक्केवारीचाही गंभीर आरोप

MPSC प्रकरणावरून झाली होती टीका

काही दिवसांपूर्वी MPSC पेपरफुटी प्रकरणात संशयित म्हणून चर्चेत आलेल्या एका व्यक्तीचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून करण्यात आला होता. या कथित संबंधांचा आधार घेत पवार यांच्यावर राजकीय टीकाही करण्यात आली होती.

मात्र, आता पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना डॉ. अफसर शेख यांनीच विरोधाची भूमिका घेतल्याने राजकीय तर्क लढवले जात आहेत. इतर वेळी पवार यांना घेरण्याची एकही संधी न सोडणारे शेख यावेळी त्यांच्या बाजूने का उभे राहिले? हा प्रश्न स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Abhimanyu Pawar MPCSC Paper Leak Case
Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात PM मोदी, 'आरएएस'बाबत खळबळ उडवून देणारे खुलासे? पुस्तक छापण्यापूर्वीच प्रकाशकाची माघार; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

फोटोतून संबंध सिद्ध होत नाहीत..

डॉ. शेख यांच्या भूमिकेतून सार्वजनिक जीवनात काम करताना राजकीय व्यक्तींसोबत अनेकांचे फोटो असू शकतात. केवळ एखाद्या व्यक्तीसोबतचा फोटो असल्याच्या आधारावर आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आमदार पवार यांनी विद्यार्थी आणि विविध घटकांचे प्रतिनिधित्व करून त्यांच्या कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे कौतुकही करण्यात आले आहे.

दरम्यान, MPSC पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित व्यक्ती आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील कथित संबंधांबाबतचे आरोप हे आरोपांच्या स्वरूपातच असून, त्यातून कोणताही दोष सिद्ध झाल्याचे गृहीत धरता येत नाही. त्यामुळे या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा वस्तुस्थिती आणि अधिकृत तपासातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com