Nanded News : नांदेड विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट : काँग्रेसने व्हीप बजावला, महायुतीच्या राजूकरांचे वाढले टेन्शन

Political News : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेची एकतर्फी वाटणारी निवडणूक यामुळे चुरशीची होणार, अशी चर्चा सुरू झाली. नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट विजयाचा दावा करत अशोक चव्हाण आणि महायुतीच्या उमेदवाराला आव्हान दिले.
Congress Politics
CongressSarkarnama
Published on
Updated on

Nanded MLC Election 2026 : ऑपरेशन टायगर ऐकून आता कंटाळा आला, तुम्ही त्याचे नाव तरी बदला, असे म्हणत मिडियालाच वेड्यात काढणारे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर अखेर शिकार ठरलेच. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र या ऑपरेशनमुळे नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर परिणाम होऊ नये, याची काळजी त्यांनी जाताजाता घेतली आहे. महाविकास आघाडीने आधी काँग्रेसच्या रामदास सुमठाणकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या घडामोडीनंतर नागेश पाटील-आष्टीकर यांचे सुपूत्र कृष्णा पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले.

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेची एकतर्फी वाटणारी निवडणूक यामुळे चुरशीची होणार, अशी चर्चा सुरू झाली. नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट विजयाचा दावा करत अशोक चव्हाण आणि महायुतीच्या उमेदवाराला आव्हान दिले. ऑपरेशन टायगरमध्ये नाव आल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडेल, काँग्रेस वेगळा निर्णय घेईल, असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच घडताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाने उद्याच्या मतदानासाठी काँग्रेसच्या सर्व नगरसेवक मतदारांना व्हिप बजावत कृष्णा पाटील आष्टीकर यांनाच मतदान करण्यास सांगितले आहे.

Congress Politics
Congress vs NCP Sharad Pawar : अहिल्यानगरचं चक्रावणारं राजकारण; काँग्रेसचे ससाणे अपक्ष, राणी लंके अचानक चर्चेत कशा? 'मविआ'साठी धोक्याची घंटा...

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षासोबत लोकसभा निवडणुकीत आधी केलेली गद्दारी पाहता त्यांचा उमेदवार निवडून येता कामा नये, यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. महायुतीचे संख्याबळ, एमआयएम व इतर पक्षांची भूमिका पाहता अमर राजूकर यांचा विजय निश्चित असल्याचे ठामपणे अशोक चव्हाण सांगताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आष्टीकर पिता-पुत्रांनी आमच्याकडे मॅजिक फिगर असल्याचा दावा करत शंभर टक्के आम्ही जिंकणार असा दावा केला आहे.

Congress Politics
Nanded: कृष्णा पाटील आष्टीकरांना 'ऑपरेशन टायगर'चा फटका बसणार? नांदेडमध्ये विधानपरिषदेची समीकरणे बदलली

कृष्णा पाटील आष्टीकर महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत, त्यांनाच मतदान करण्याचे काँग्रेस पक्षाचे आदेश निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अर्थात काँग्रेससमोर दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने त्यांनी कृष्णा पाटील आष्टीकर यांनाच मदत करण्याचा निर्णय घेतला असावा, असेही सांगितले जाते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका , सर्व नगरपरिषदा , नगरपंचायतीतील काँग्रेस नगरसेवकांनी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनाच मतदान करण्याचा व्हिप बजावण्यात आला आहे.

Congress Politics
Nanded MLC: नांदेड विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट : अशोक चव्हाणांची 'गुलालाची' तयारी सुरु असतानाच आष्टीकरांनी वाढवली धाकधूक

नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण, उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार सत्तार यांच्या या व्हिपवर स्वाक्षऱ्या आहेत. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे अशोक चव्हाण आणि महायुतीचे उमेदवार अमर राजूकर यांचे टेन्शन काहीसे वाढणार आहे.

Congress Politics
Nanded MLC election: "राजकारणात काहीही अशक्य नाही": श्रीकांत शिंदेंच्या गुप्त भेटीनंतर चिखलीकरांचा सूचक इशारा; भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com