Nanded MLC election: "राजकारणात काहीही अशक्य नाही": श्रीकांत शिंदेंच्या गुप्त भेटीनंतर चिखलीकरांचा सूचक इशारा; भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?

Pratap Patil Chikhalikar News : नांदेड विधान परिषद मतदारंसघातून प्रताप पाटील-चिखलीकर यांचे सुपूत्र प्रविण चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.
Pratap Chikhlikar
Pratap Chikhlikar Sarkarnama
Published on
Updated on

NCP Politics News : विधान परिषदेच्या सतरा जागांचे महायुतीतील वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर आलेली असताना युतीमध्ये कमालीची स्पर्धा सुरू आहे. इकडे नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

शिवसेनेचे (Shivsena) खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा नुकताच नांदेडमध्ये शिवसंवाद दौरा झाला. या दौऱ्यात चिखलीकर यांनी त्यांची मध्यरात्री हाॅटेलमध्ये जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटी संदर्भात माध्यमांनी जेव्हा चिखलीकरांना बोलते केले तेव्हा राजकारणात काहीही अशक्य नाही, असे म्हणत त्यांनी या मतदारसंघातील सस्पेन्स वाढवला. विशेष म्हणजे नांदेड विधान परिषद मतदारंसघातून प्रताप पाटील-चिखलीकर यांचे सुपूत्र प्रविण चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

Pratap Chikhlikar
Maharashtra Politics Live Update : विजय पाटकर यांच्यावर मेघराज भोसले यांचा पलटवार; 'माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा...'

महायुतीमध्ये ही जागा भाजपाच्या (BJP) वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित आहे. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमरनाथ राजूकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भाजपमधील निष्ठावंतांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वाढती जवळीक भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.

Pratap Chikhlikar
MLC Election : सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी 'राष्ट्रवादी'चा पुन्हा ZP पॅटर्न? संख्याबळाने वाढवली भाजपची धडधड

आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी 'राजकारणात काहीही शक्य असते' असे सूचक विधान करत आगामी काळातील राजकीय घडामोडींचे संकेत दिले. महाविकास आघाडीकडूनही विधान परिषद निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Pratap Chikhlikar
Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगतानाच मी महायुतीचा धर्म पाळणार असून, महायुतीचेच काम करणार असेही ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यात महायुतीचे प्रमुख नेते म्हणून खासदार अशोक चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. दुसरीकडे, अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. या दोन नेत्यांमधून विस्तवही आडवा जात नाही, अशी चर्चा कायम असते.

Pratap Chikhlikar
Marathwada Shivsamvad tour: निवडणुकीच्या नादात 22 गुंठे जमीन विकली, भाजप उमेदवाराकडून पराभव; संकटात सापडलेल्या शिवसैनिकाला मदतीचा हात

अशा परिस्थितीत प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या संभाव्य भूमिकेमुळे महायुतीसमोर नवे राजकीय आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचे आपल्याला माध्यमांतूनच समजल्याचे सांगत आमदार चिखलीकर यांनी या संपूर्ण प्रकरणापासून सावध अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला.

Pratap Chikhlikar
MLC Election : 'धाराशिव-बीड-लातूर'साठी भाजपकडून 4 नावे दिल्ली दरबारी; एका नावावर होणार शिक्कामोर्तब!

प्रवीण चिखलीकर अखेर निवडणूक रिंगणात उतरणार का? तसे झाल्यास त्याचा महायुतीच्या राजकारणावर काय परिणाम होणार, तसेच अशोक चव्हाण-चिखलीकर संघर्षाला नवे वळण मिळणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीकडून भाजपाचे अमर राजूरकर यांची उमेदवारी निश्चित समजली जात असताना आमदार चिखलीकर यांचे पुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतल्याने या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. तर प्रवीण पाटील चिखलीकर यांनी विधान परिषद निवडणूक लढवावी की नाही? हे त्यानेच ठरवावे, असे वक्तव्य प्रताप पाटील चिखलीकर यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Pratap Chikhlikar
MLC Election : नेत्यांची धाकधूक वाढली! विधान परिषदेच्या जागांची शिवसेना, भाजपमध्ये अदलाबदली? 'या' मतदारसंघांत रात्रीतून खेळ बदलणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com