Santosh Danve-Sanjana Jadhav : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मामा, भाचा, बहिण-भाऊ अन् सौभाग्यवतीही..

Nagpur Winter Session News : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात सत्ताधारी अन् विरोधक यांच्यातील टीका, आरोप-प्रत्यारोपामुळे थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे.
Santosh Danve-Sanjana Jadhav familay
Santosh Danve-Sanjana Jadhav familay Political news
Published on
Updated on

Assembly Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात सत्ताधारी अन् विरोधक यांच्यातील टीका, आरोप-प्रत्यारोपामुळे थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे. या शिवाय अधिवेशनात चर्चा होतेय ती मंत्री, आमदारांच्या एन्ट्री आणि पेहरावाची. आता नव्याचे अशीच चर्चा होत आहे ती विधीमंडळ परिसरात झालेल्या मामा, भाचा, बहिण-भाऊ अन् सौभाग्यवतींची.

Santosh Danve-Sanjana Jadhav familay
TET latest news : राज्य सरकार TET विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार का? मंत्री पंकज भोयर यांनी दिली मोठी अपडेट

भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजकीय वारसा पुढे चालवणारे त्यांचे आमदार पूत्र संतोष दानवे, आमदार कन्या संजना जाधव यांच्यासोबत त्यांचा मुलगा आदित्यवर्धन आणि संतोष दानवे यांच्या होम मिनिस्टर रेणू दानवे यांची आज एकत्रित विधीमंडळ परिसरात एन्ट्री झाली. एकाच वेळी मामा-भाचा, बहिण-भाऊ आणि पती पत्नी सोबत आल्याने छायाचित्रकारांसाठी ही पर्वणीच ठरली.

Santosh Danve-Sanjana Jadhav familay
BJP internal election caste factor : भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी कोणत्या जातीचं वर्चस्व? 11 पैकी नऊ...

अधिवेशन काळात कुटुंबातील सदस्यांनी विधीमंडळात कामकाज कसे चालते? निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मतदारसंघाचे प्रश्न सभागृहात कसे मांडतात? हे पाहण्यासाठी उत्सुकतेने येत असतात. भाजपचे (BJP) आमदार संतोष दानवे हे भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. फडणवीस सरकारने त्यांच्यावर पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सोपवली आहे.

Santosh Danve-Sanjana Jadhav familay
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी नागपुरात बसून हलविली बालेकिल्ल्यातील सुत्रं; महापालिका निवडणुकीसाठी ठरली रणनीती...

या शिवाय दानवे यांच्या भगिनी संजना जाधव या कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेकडून (Shivsena) पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. शनिवारी नागपूरात त्यांच्यासोबत मुलगा आदित्यवर्धन हा देखील होता. मामा-भाचा, बहिण-भाऊ, पती-पत्नी या सगळ्यांना एकत्र पाहिल्यानंतर दानवे- जाधव यांच्या कुटुंबातील तिसरी पिढीही राजकारणात येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Santosh Danve-Sanjana Jadhav familay
Mahayuti alliance : महायुतीचे ठरलं; पण १३ महापालिकेत जागावाटप, महापौर, इतर पदावरून तिढा! शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात 'पॉवर' गेम सुरू!

आमदार संतोष दानवे यांच्या पत्नी रेणू दानवे या राजकीय घराण्याच्या सून असल्या तरी राजकारणापासून त्या अंतर राखून असतात. संतोष दानवे यांच्यासोबत राजकीय व्यासपीठावरही त्या फार दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीदरम्यान भोकरदन शहरात त्यांनी प्रचारासाठी काही गाठीभेटी घेतल्या होत्या, मात्र कौटुंबिक जबाबदारीलाच त्याचे अधिक प्राधान्य दिसून आले आहे. आज पहिल्यादांच त्या पती, भाचा, नणंद यांच्यासोबत नागपूर विधानभवनात आल्या होत्या.

Santosh Danve-Sanjana Jadhav familay
Pune NCP : महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टार्गेट लाडकी बहीण नव्हे तर 'Gen Z'

संतोष दानवे यांच्या पंचायत राज समितीच्या कार्यालयाला या सगळ्यांनी भेट दिली. येथूनच रेणू दानवे, भाचा आदित्य जाधव यांनी विधिमंडळाचे कामकाज, अधिवेशनाची प्रक्रिया, समित्यांची भूमिका याबाबतची माहिती घेतली. या दानवे-जाधव यांच्या एकत्रित भेटीतून राजकीय ताकद, कौटुंबिक एकजूट आणि पुढील पिढीकडे जाणारा वारसा असे चित्र दिसले.

Santosh Danve-Sanjana Jadhav familay
Congress president news : भाजपला अध्यक्ष सापडेनात, आता काँग्रेसमध्येही खळबळ; मल्लिकार्जून खर्गेंबाबत आमदाराचा ‘लेटरबॉम्ब’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com