

नांदेड शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून तब्बल 4 हजार 250 कोटी रुपयांचा महत्त्वाकाक्षी प्रकल्प नांदेडमध्ये उभारला जाणार आहे. निवडणुकीच्या काळात नांदेडच्या विकासाबाबत दिलेला शब्द मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांनी आता प्रत्यक्षात उतरवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या प्रकल्पामुळे नांदेडच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि नांदेडकरांना आश्वासन दिले होते की, 'नांदेडकरांनी कमळाची काळजी करावी, त्यानंतर पुढील पाच वर्षे नांदेडची चिंता मी करेन,'असे त्यांनी सांगितले होते. नांदेडच्या विकासासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलेल. आता नांदेडसाठी मोठा औद्योगिक प्रकल्प जाहीर करून त्यांनी दिलेला शब्द पाळल्याचे चित्र दिसत आहे.
विधानसभेत करण्यात आलेल्या घोषणेनुसार राज्य सरकार व 'रिटाव्हिया प्रायव्हेट लिमिटेड' दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराबाबत आहे. या कराराअंतर्गत नांदेडमध्ये हेलिकॉप्टर निर्मिती, जुळवणी आणि सुट्या भागांच्या उत्पादनाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, हेलिकॉप्टरसाठी आवश्यक अभियांत्रिकी सेवा आणि देखभाल व दुरुस्ती सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा प्रकल्प उभारला गेल्यानंतर स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. अंदाजे 1800 ते 2000 लोकांना थेट रोजगार मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वाहतूक, सेवा, लघुउद्योग आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. शिवाय मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासात अधिक भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्याचे धोरण राबवले जात असून त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये हा महत्त्वाचा प्रकल्प येत आहे. या प्रकल्पामुळे नांदेडचे औद्योगिक महत्त्व वाढण्याबरोबरच मराठवाड्यातील विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.